ETV Bharat / state

मुंबईत राज ठाकरेंची तोफ धडाडणार; सभेकडे नाशिककरांसह भुजबळांचेही लक्ष

author img

By

Published : Mar 19, 2019, 12:56 PM IST

मुंबईत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार.... नाशकात मनसेचे प्राबल्य असल्याने ठाकरेंच्या सभेकडे भुजबळांचेही लक्ष... राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर करण्याचीही शक्यता

राज ठाकरे आणि छगन भुजबळ

नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नाही, हे जाहीर केले आहे. त्यामुळे आज मुंबईमध्ये होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात, याकडे मनसे कार्यकर्त्यांसोबतच भुजबळांचेही लक्ष राहणार आहे. कारण, नाशिक लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ निवडणूक रिंगणात आहेत. तर, नाशकात मनसेचेही काही प्रमाणात प्राबल्य आहे.

या निवडणुकीत मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार असे काही प्रमाणात निश्चित झाले आहे. त्यामुळे, राज ठाकरे हे प्रचारात स्वतः उतरणार की मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सूचना देणार याची उसुक्तता सर्वांना लागली आहे.
2004 मध्ये नाशिकमध्ये भुजबळांचा जोर होता -
2009 मध्ये मनसेचे वादळ नाशिकमध्ये धडकले आणि राज यांनी एकट्याच्या जोरावर नाशिकमध्ये ३ आमदार आणि ४० नगरसेवकांसह महानगरपालिकेवर मनसेचा झेंडा फडकवला. तसेच 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवाराला चांगलीच टक्कर दिली. यावेळी गोडसेंना दुसऱ्या पसंतीचे मते मिळाली होती. मात्र, राज यांची जादू पुढच्या निवडणूकीत चालू शकली नाही, आणि 2014 मध्ये मोदी लाटेमुळे मनसेला नाशकात मोठा फटका बसला. यानंतर अनेक नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेची साथ सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. मात्र, असे असले तरी राज ठाकरे यांना मानणारा मोठा युवा वर्ग नाशिकमध्ये आहे. याची कल्पना भुजबळांनादेखील आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी छगन भुजबळांनी सहकुटुंब राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली होती.

यंदाच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये आघाडीच्या एखाद्या व्यासपीठावर येऊन नाशिककरांना आवाहन केले तर त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांना होऊ शकतो. तसेच नाशिकमधील मनसेची संघटना आणि नेटवर्क आघाडीच्या उमेदवाराला फायदेशीर ठरेल. त्यामुळे आज मुंबईत होत असलेल्या राज ठाकरे यांच्या सभेत ते काय भूमिका घेतात याकडे समस्त नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

Intro:Body:

नाशिक-राज ठाकरे ह्यांच्या भाषणा कडे भुजबळांचे लक्ष..

Inbox

    x

KAPIL PRAKASH BHASKAR

11:15 AM (3 minutes ago)

to me, Kapil

आजच्या मुंबईतील मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात ह्या कडे भुजबळांचे लक्ष...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नाही हे जाहीर केलं आहे.त्यामुळे आज मुंबई मध्ये होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे  काय बोलतात ह्या कडे मनसे कार्यकर्त्यांन सोबच भुजबळांचेही लक्ष राहणार आहे .नाशिक लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षा कडुन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ ह्याचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ निवडणूक रिंगणात आहे ..ह्या निवडणुकीत मनसे ,राष्ट्रवादी कॉग्रेस ला पाठिंबा देणार असं काही प्रमाणत निश्चित झालं आहे..मात्र राज ठाकरे हे प्रचारात स्वतःउतरणार की मनसेच्या  स्थानिक पदाधिकाऱ्यांना सूचना देणार ह्या कडे उसुक्त सर्वांना आहे ..

2004 मध्ये नाशिक मध्ये भुजबळांचा जोर होता..

2009 मध्ये राज ठाकरे ह्यांचं मनसेचे वादळ धडकला आणि राज यांनी एकट्या च्या जोरावर नाशिक मध्ये 3 आमदार आणि 40 नगरसेवक सह महानगरपालिकेवर मनसेचा झेंडा फडकवला होता..तसेच 2009 मध्ये झालेल्या लोकसभा च्या निवडणूकीत मनसेचे उमेदवार हेमंत गोडसे ह्यानी राष्ट्रवादी चे उमेदवार ह्यांना चांगलीच टक्कर देत दुसऱ्या पसंतीचे मते मिळवली होती...

पण राज यांची जादू पुढच्या निवडणूकीत चालू शकली नाही,आणि 2014 मध्ये मोदी लाटे मुळे मनसेला ही नाशिक मोठा फाटा बसला..या नंतर अनेक नगरसेवकांनी आणि पदाधिकारयांनी मनसेची साथ सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला...मात्र असं असलं तरी राज ठाकरे ह्यांना मानणारा मोठा युवा वर्ग नाशिक मध्ये असल्याचं भुजबळ ह्यांना कल्पना असल्याने काही दिवसांन पूर्वी छगन भुजबळ ह्यानी सह कुटुंब राज ठाकरे ह्याचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज वर जाऊन भेट घेतली....

यंदाच्या निवडणूकीत राज ठाकरे ह्यांनी यांनी नाशिक मध्ये आघाडीच्या एखाद्या व्यासपीठावर येऊन नाशिककरांना आवाहन केलं तर त्याचा फायदा राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांना होऊ शकतो...तसेच नाशिक मधील मनसेची संघटना आणि नेटवर्क आघाडीच्या उमेदवरला फायदेशीर ठरेल.

मात्र आज मुंबईत होत असलेल्या राज ठाकरे काय भूमिका घेतात ह्या कडे सर्व नाशिककरांचं लक्ष लागलंय...

टीप बातमीला राज ठाकरे आणि भुजबळांचा फोटो वापरणे..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.