ETV Bharat / state

Raj Thackeray On Trimbakeshwar : 'कोणी मंदिरात आल्याने आपला धर्म बुडेल एवढा तो कमकुवत आहे का?' - MNS President Raj Thackeray

१३ मे रोजी घडलेल्या घटनेमुळे त्र्यंबकेश्वर मंदिराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर उरूस आयोजकांनी पुढील वर्षीपासून त्र्यंबकेश्वरला धूप न दाखवण्याचा निर्णय घेतला. या मंदिराच्या मुद्द्यावर जे काही झाले ते राजकारण, आरोप-प्रत्यारोप होते. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. हा प्रश्न गावकऱ्यांनी सोडवायचा असून इतरांनी छेडछाड करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray
author img

By

Published : May 20, 2023, 6:28 PM IST

राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

नाशिक : त्र्यंबकेश्वरची प्रथा जुनी आहे असे समजते. कोणी आल्याने आपला धर्म बुडेल एवढा आपला धर्म कमकुवत आहे का? कोणाला दंगली हव्या आहेत का? निवडणूक जवळ येतील तसे हे दंगलीचे प्रकार समोर येतील. गड किल्ल्यांवरील दर्गे हटवले पाहिजे असे मी अनेकदा म्हटलो आहे. पण त्याचा विचार होत नाही, चुकीच्या गोष्टीवर प्रहार केलाच पाहिजे अस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले. राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असतांना पत्रकारांशी बोलत होते.

बहुसंख्य हिंदू राज्यात खतरे मे? : आगामी निवडणुकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन नाशिक दौऱ्यावर आहे. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले. मराठी मुसलमान जिथं राहतात तिथं दंगली होत नाही. निवडणूका जवळ आल्यावर बहुसंख्य हिंदू राज्यात खतरे मे है असे कसे होईल, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. नाशिक दत्तक घेऊन काय केले, असा प्रश्न ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे यांनी हा प्रश्न तुम्ही सत्ताधाऱ्यांना का विचारत नाही असा प्रतिप्रश्न पत्रकारांना करत फडणवीस यांच्यावर ठाकरे यांनी टीका केली.

नोटबंदीवरुन टीका : केंद्र सरकारच्या नोटबंदीवर बोलतांना ते म्हणाले की, केंद्र सरकार निर्णय घेतांना विचार करत नाही. हा धरसोड करण्याचा प्रकार आहे अशाने सरकार चालत नाही? मी तेव्हाच नोटबंदीवर बोललो होतो. त्यावेळी 2 हजारच्या नोटा atm मध्ये पण जात नव्हत्या अशी टीका त्यांनी मोदी सरकारवर केली आहे. नाशिकला आयोजित नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी गोंधळ करत काही मद्यपिनी पत्रकारांना मारहाण केली होती. मात्र, या कार्यक्रमाचा मनसेशी काही संबंध नसल्याचा राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. एका राज्यावरून देशाचे समीकरण बदलत नाही. बदलाची नांदी आहे का पहायचे आहे असे राज ठाकरे यांनी कर्नाटक निकालावर भाष्य केले. बारसू प्रकरणावर बोलतांना जमिनीच्या व्यवहारातून या गोष्टी होता. कमी भावात जमिनी घ्यायच्या, जास्त भावात सरकारला विकायच्या असा धंदा आहे. जैतापूरच काय झालं? जैतापूरला का नाही होत प्रकल्प?असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.

कोणी सत्तेचा अमर पट्टा घेऊन आले नाही : देशात सध्या इडी, बिडीचे व्यवहार सुरू आहे. कोणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नसते. उद्या दुसरं सरकार आलं तर ते आणखी जास्त याचा वापर करतील. त्यामुळे आपण कुठल्या गोष्टींचे पायंडे पाडून ठेवतो याचा सत्ताधाऱ्यांनी विचार करणे गरजेचे असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -

  1. Nitesh Rane On Uddhav Thackeray : दोन हजार रुपयांच्या नोटाबंदीमुळे उद्धव ठाकरेंची चिंता वाढली - नितेश राणे
  2. Sameer Wankhede CBI Inquiry : समीर वानखेडेंची सीबीआयकडून 5 तास चौकशी, बाहेर येताच म्हणाले, सत्यमेव जयते
  3. Karnataka CM Oath Ceremony : सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.