ETV Bharat / state

पबजीसारखे मोबाईल गेम्स मुलांसाठी ड्रग्स - विद्यार्थी मानसोपचार तज्ज्ञ - नाशिक

एका सर्व्हेनुसार प्राथमिक शाळेपासून १८ वर्षापर्यंत एखादा विद्यार्थी जेवढा वेळ शाळेत घालवतो. त्यापेक्षा जास्त वेळ विद्यार्थी व विध्यार्थीनी स्मार्टफोन आणि टीव्हीवर घालवत असल्याचे समोर आले आहे.

पबजी गेम
author img

By

Published : Mar 23, 2019, 6:36 PM IST

Updated : Mar 23, 2019, 9:11 PM IST

नाशिक - पबजी गेम्ससारखे हिंसक मोबाईल गेम्स मुलांसाठी ड्रग्सच आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नाशिक येथील विद्यार्थी मानसोपचार तज्ज्ञसचिन उषा विलास जोशी यांनी व्यक्त केले.

पबजी गेमबद्दल माहिती देताना विद्यार्थी मानसोपचार तज्ज्ञ सचिन उषा विलास जोशी

नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी एक अल्पवयीन मुलगा पबाजी गेम खेळण्यात व्यग्र होता. त्यामुळे त्याच्या आईने त्याच्या जवळचा मोबाईल काढून घेतला. त्यांनंतर विषारी औषध घेऊन त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. अशाचप्रकारे पबजी गेमच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी दक्षिण कोरियामध्ये कौन्सलिंग सेंटर उघडले आहे. तेथील प्रत्येक शाळेत मानसोपचार तज्ज्ञाद्वारे समुपदेश केले जाते. सध्या घडणाऱ्या घटनांवरून अशीच परिस्थिती भारतामध्ये येणार असल्याचे सचिन जोशी सांगतात.

एका सर्व्हेनुसार प्राथमिक शाळेपासून १८ वर्षापर्यंत एखादा विद्यार्थी जेवढा वेळ शाळेत घालवतो. त्यापेक्षा जास्त वेळ विद्यार्थी व विध्यार्थीनी स्मार्टफोन आणि टीव्हीवर घालवत असल्याचे समोर आले आहे.

काय आहे पबजी गेम?
पबजीसारखे गेम हिंसात्मक असतात. या गेममध्ये १०० खेळाडू एका बेटावर शस्त्र वापरून इतरांशी लढाई करतात. एकमेकांना मारून स्वतःला वाचवायचे असते. जो जिवंत राहतो तोच जिंकत असतो.
यांसारख्या गेमने विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये सातत्याने दुसऱ्याला मारण्याचे प्रोग्रामिंग होते. गेम खेळताना आनंद मिळत असतो. मात्र, तसे झाले नाहीतर तरुण वेडापिसा होतो. हिंसक बनत जात असल्याचे जोशी सांगतात.

पालकांनी काय करावे?

  • मुलांना मोबाइलवर गेम खेळण्याची सवय लावू नये आणि मुलांचा याबाबतचा हट्ट पुरवून नये.
  • मुले मोबाइलवर काय बघतात? कुठला गेम खेळतात? हे डोळ्यात अंजन टाकून पाहावे.
  • मुलांना वयाच्या १८ वर्षापर्यँत स्मार्ट फोन देऊ नये
  • स्मार्ट फोन दिल्यास त्याचा वापर आणि नियंत्रण पालकांच्या देखरेखी खाली आणि कडक शिस्तीत ठेवावे.
  • मुलांना मैदानावर खेळू द्यावे तसेच विविध क्रियांमध्ये गुंतवून ठेवावे.

Intro:पबजी सारखे मोबाइल गेम मुलांसाठी ड्रक्स-शिक्षण अभ्यास सचिन जोशी यांचं मत..

मोबाइल वर पबजी गेम खेळण्यात व्यस्त असलेल्या मुलांची आत्महत्या,पबजी गेम खेळू दिला नाही म्हणून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न,पबाजी गेम जास्त वेळ खेळतांना मुलगा बेशुद्ध..अशा या ना त्या घटना रोज कुठेना कुठे घडत आहे..
पबजी सारखे हिंसक मोबाइल गेम हे मुलांना साठी ड्रक्स चे काम करत असून,पालकांनी आपल्या मुलांना कडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मतं नाशिक येथील शिक्षक अभ्यास सचिन उषा विलास जोशी यांनी व्यक्त केलं आहे...

Body:नाशिक मध्ये काही दिवसांन पूर्वी एक अल्पवयीन मुलगा पबाजी गेम खेळण्यात इतका गुंगून गेला होता, जेव्हा त्यांच्या आईनं ने त्याच्या काढून मोबाइल काढून घेतला तेव्हा त्याने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे,ह्या वरून मुलं ह्या मोबाइल गेम च्या किती व्यसनाधीन झाले आहे हे समोर आलं आहे.
दक्षिण कोरिया मधील शाळकरी मुलं स्मार्टफोनच्या इतके आहारी गेले आहेत की तेथील सरकारने शाळेमध्ये स्मार्ट फोन कौन्सलिंग सेंटर उघडले आहे,येथील प्रत्येक शाळेत सायकॉलॉजीस्ट नियुक्त करून समुपदेशक सुरू आहे..हीच परिस्थिती भारता मध्ये येण्याची परिस्थिती सध्याच्या घटना वरून दिसून येत असल्याचं सचिन जोशी यांनी सांगितलं ..

#पबाजी सारखा गेम विद्यार्थी या टोकाला जातात?
खरंतर पबाजी सारखे गेम बे हिंसात्मक असतात,पबाजी गेम मध्ये 100 खेळाडू एका बेटावर शस्त्र वापरून इतरांशी लढाई करतातएकमेकांना मारून स्वतःला वाचवायचे असते,जो जिवंत राहील तो जिंकला,
या सारख्या गेम ने विद्यार्थ्यांच्या मेंदू मध्ये सातत्याने दुसऱ्याला मारण्याचे प्रोग्रामिंग होते,आपला मेंदू कॉम्पुटर सारखच काम करतो,त्याला जे प्रोसेसिंग करू तसेच तो वागतो..
जेव्हा एखादा तरुण ड्रक्स हिरोइन घेतात तेव्हा सुरवातीला त्याला जे प्लेझर मिळते त्याच प्रकारचे प्लेझर व्हिडीओ गेम मध्ये मिळते व तस मिळाले। नाही तर तो तरुण वेडापिसा होतो, हिंसक होतो त्यांच्या वर्तणुकीत बद्दल देखी होत असल्याचं जोशी सांगतात..

एका सर्व्ह नुसार प्रायमरी पासून 18 वर्षापर्यँत एखादा विद्यार्थी जेवढा वेळ शाळेत घालवतो,त्यापेक्षा जास्त वेळ विद्यार्थी व विध्यार्थीनी स्मार्टफोन मोबाइल टीव्ही वर घालवता,
पालकांनी काय करावे
1)मुलांना मोबाइल वर गेम खेळण्याची सवय लावू नये..या बाबत हट्ट पुरवून नये..
2) मुलं मोबाइल वर काय बघतात,कुठला गेम खेळता हे डोळ्यात अंजन टाकून पहावे.
3) शक्यतो मुलांना 18 वर्ष होइ पर्यँत स्मार्ट फोन देऊ नये.
4) स्मार्ट फोन दिलाच तर त्याचा वावर आणि नियंत्रण पालकांच्या देखरेखी खाली आणि कडक शिस्तीत ठेवावे..
5) मुलांना भरपूर मैदानावर खेळू द्यावे,विविध अक्टिव्हिटी गुंतवून ठेवावे..

Conclusion:
Last Updated : Mar 23, 2019, 9:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.