नाशिक - दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त झाल्या पाहिजे म्हणून शिक्षण विभाग एकीकडे प्रयत्न आहे. मात्र, याच्या उलट चित्र परीक्षा केंद्रावर दिसत आहे. नाशिक मधील माजी शिक्षक आणि आमदार अपूर्व हिरे यांच्या रोहिले आश्रमशाळा येथे दहावीच्या परीक्षा केंद्रांवर कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट झाला आहे. या केंद्रावर पोलीस प्रशासन देखील कॉपी पुरवण्यात मदत करत असल्याचे दिसून येत आहे.
बीजगणिताचा पेपर सुरू असताना हा कॉपीचा प्रकार चालू होता. केंद्राबाहेर जमलेले विद्यार्थ्यांचे मित्र, नातेवाईक शाळेच्या भिंतीवर चढून कॉपी पुरवत आहेत. मात्र, त्यांना कोणीही अडवताना दिसत नाही. पोलीस प्रशासन आणि शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना दिसत आहेत. पिंपरी दरेगाव, वेळू, नजे, पिंपळगाव आणि रोहिले या ५ शाळेचे विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी येतात. एवढ्या मोठ्या परिक्षा केंद्रावर बिनधास्तपणे कॉपी सुरू आहे. मात्र, अशा हलगर्जीपणा करणाऱ्या शिक्षकांवर आणि पोलीसांवर कारवाई झाली पाहिजे. पंरतु, शिक्षणविभाग याकडे काणाडोळा करत आहे.
शिक्षण विभाग परिक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी कंबर करत आहे. त्यासाठी राज्यभरात भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. परंतु, याचा काही एक कॉपी बहाद्दरांवर होताना दिसत नाही. हेच यातून स्पष्ट होत आहे.