ETV Bharat / state

नाशिकमध्ये पोलिसाचा सावत्र मुलांवर गोळीबार, दोन्ही भावंडांचा मृत्यू - raj temple

नाशिकमध्ये आज बाप आणि मुलांमध्ये जोरदार भांडण झाले यामध्ये बापाने आपल्या मुलावरच गोळीबार केला आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण रूग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू पावला. ही घटना नाशिक शहरात घडली. आरोपी पोलिसाला ताब्यात घेतले आहे.

नाशिकमध्ये पोलिसाचा सावत्र मुलांवर गोळीबार
author img

By

Published : Jun 21, 2019, 6:08 PM IST

Updated : Jun 21, 2019, 7:28 PM IST

नाशिक - शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक संजय भोये यांनी घरगुती भांडणातून सावत्र मुलांवर गोळीबार केला आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण रुग्णालयात उपचार घेत असताना मरण पावला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून संशयित आरोपी पोलीस नाईक संजय भोये यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नाशिकमध्ये पोलिसाचा सावत्र मुलांवर गोळीबार

अधिक माहिती अशी, पंचवटी भागातील अश्वमेध नगर येथे राजमंदिर इमारतीत उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक संजय अंबादास भोये यांच्यात आणि मुलांमध्ये भांडण झाले, हे भांडण इतके विकोपाला गेले की, वडिलांनी सावत्र मुलांवरच गोळीबार करत सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून ३ गोळ्या झाडल्या. यामध्ये सोनू नंदकिशोर चिखलीकर (वय २५) याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा मुलगा शुभम हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली.

nsk
नाशिकमध्ये पोलिसाचा सावत्र मुलांवर गोळीबार

अधिक माहितीनुसार सोनू चिखलीकर हा नौदलात कार्यरत होता, तर शुभम नाशिकमधील एका खासगी कंपनीत नोकरीला असल्याचे समजते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून संशयित आरोप पोलीस नाईक संजय भोये यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Intro:पोलीस कर्मचाऱ्यांचा सावत्र मुलांवर गोळीबार, एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी..

Body:शहरातील उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक संजय भोये यांनी घरगुती भांडणातून सावत्र मुलांवर केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर रीत्या जखमी झाला आहे,

अधिक माहिती अशी पंचवटी भागातील अश्वमेध नगर येथे राजमंदिर इमारतीत उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक संजय अंबादास भोये यांच्यात आणि मुलांमध्ये भांडण झाले ,भांडण इतके विकोपाला गेले की वडिलांनी सावत्र मुलांवर गोळीबार करत सर्विस रिवॉल्वरने तीन गोळ्या झाडल्या,जीव वाचवण्यासाठी मुलं बाथरुम मध्ये जाऊन लपली असता, ह्या गोळीबाराच्या घटनेत दोघेही मुले गंभीर जखमी झाले, यात सोनू नंदकिशोर चिखलीकर वय 25 या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा मुलगा शुभम नंदकिशोर चिखलीकर हा गंभीर रित्या जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे,अधिक माहितीनुसार सोनू चिखलीकर हा नौदलात कार्यरत होता, तर शुभम नाशिक मधील एका खाजगी कंपनीत नोकरीला असल्याचे समजत..
ह्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून संशयित आरोप पोलीस नाईक संजय भोये याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे..
टीप फीड ftp
nsk police firing viu 1
nsk police firing viu 2
nsk police firing viu 3
nsk police firing viu 4

Conclusion:
Last Updated : Jun 21, 2019, 7:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.