नाशिक - भाविक सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात होते त्यावेळी पिकपला अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये ३० जण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवार (दि. 27 डिसेंबर)रोजी घडली आहे. आज सकाळच्या सुमारास दाभाडी येथील बंडु गांगुर्डे यांच्या पिकअप क्रमांक (एमएच १८ बी. झेड. ८१६७)मधून हे भाविक सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात होते. त्यावेळी सप्तशृंगीचे मंदिर अवघे एक किलोमीटर अंतरावर असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप पलटी झाले. (Accident of devotees going to Saptshringi Fort) त्यामधील सुमारे 30 भाविक या अपघातात जखमी झाले आहेत. दरम्यान, यानंतर गडावरील नागरिकांनी आणि पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत काही जखमींना वणी तर काहींना नांदुरी येथे पुढील उपचारासाठी दाखल केले. वणी ग्रामीण रुग्णालयात २३ जखमींवर उपचार सुरु आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटल्याची माहिती समाेर येते आहे.
Nashik Accident: सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या पिकअपला अपघात, तीसजण जखमी - 30 people were injured
मालेगावतील दाभाडी येथून सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा अपघात हाेऊन ३० जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. (Nashik Accident) ही घटना मंगळवार (दि. 27 डिसेंबर)रोजी घडली आहे.
![Nashik Accident: सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या पिकअपला अपघात, तीसजण जखमी Accident on pick up of devotees going for darshan at Saptshringi Fort, 30 injured](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17325221-40-17325221-1672143254407.jpg?imwidth=3840)