ETV Bharat / state

नाशकात मंगल कार्यालयामध्ये लग्नसोहळ्यास परवानगी , 'हे' आहेत नियम - नाशकात मंगल कार्यालयामध्ये लग्नसोहळ्यास परवानगी

परवानगी जरी मिळाली असली तरी काही नियम व अटीही घालण्यात आल्या आहेत. सोहळ्यात केवळ 50 लोकांनाच सहभागी होता येणार आहे. याशिवाय घरात किंवा घराच्या परिसरात लग्न समारंभ आयोजित करण्याची परवानगीही कायम आहे. या आदेशामुळे ज्यांच्या घरी लग्न आहे, अशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Permission for wedding ceremony
मंगल कार्यालयामध्ये लग्नसोहळ्यास परवानगी
author img

By

Published : Jun 23, 2020, 7:42 PM IST

नाशिक - कोरोनामुळे यंदा ऐन लग्नसराईत म्हणजेच एप्रिल, मे आणि जून महिन्यात मंगल कार्यालय, लॉन्स बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे, अनेक विवाह पुढे ढकलण्यात आले. तर, काही विवाह हे घरात अगदी साधेपणाने अवघ्या 30 ते 50 लोकांच्या उपस्थितीत पार पडले. मात्र, आता ज्या मंगल कार्यालयात, हॉलमध्ये वातानुकूलितची सुविधा (एसी) नसेल अशांना लग्न समारंभाची परवानगी देण्यात आली आहे.

परवानगी जरी मिळाली असली तरी काही नियम व अटीही घालण्यात आल्या आहेत. सोहळ्यात केवळ 50 लोकांनाच सहभागी होता येणार आहे. याशिवाय घरात किंवा घराच्या परिसरात लग्न समारंभ आयोजित करण्याची परवानगीही कायम आहे. या आदेशामुळे ज्यांच्या घरी लग्न आहे, अशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आतापर्यंत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मंगल कार्यालय , लॉन्स येथे लग्न समारंभ करण्यास मनाई करण्यात आली होती. परंतु आता या आदेशामुळे अशा समारंभासाठी परवानगीची मागणी केल्यास ती संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडून देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी याबद्दल माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.