ETV Bharat / state

मालेगावहून 45 दिवसांनी घरी परतल्या कोरोना योद्धा डॉ. स्वाती वाघ, रहिवाशांनी केली पृष्पवृष्टी

author img

By

Published : May 8, 2020, 1:09 PM IST

Updated : May 8, 2020, 1:36 PM IST

मालेगाव येथे गेल्या 45 दिवसांपासून जीवाची बाजी लावत कोरोना वार्डात सेवा बजावत असलेल्या डॉ. स्वाती वाघ आपल्या घरी परतल्या. मात्र, आपण मालेगावहून आल्याचे समजल्यास अपार्टमेंटमधील लोक आपल्याला तिथे राहू देतील की नाही, ही धाकधूक मनात घेऊन त्या आपल्या घरी परतल्या.

मालेगावहून 45 दिवसांनी घरी परल्या कोरोना योद्धा डॉ. स्वाती वाघ

नाशिक - राज्यभरासह जिल्ह्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या मालेगावमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनासह आरोग्य पथके शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अनेक वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी तर गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून आपल्या घरचा रस्तादेखील पाहिला नाही. यातीलच एक आहेत नाशिकच्या सिडको परिसरातील रहिवासी डॉ. स्वाती वाघ.

मालेगाव येथे गेल्या 45 दिवसांपासून जीवाची बाजी लावत कोरोना वॉर्डात सेवा बजावत असलेल्या डॉ. स्वाती वाघ आपल्या घरी परतल्या. मात्र, आपण मालेगावहून आल्याचे समजल्यास अपार्टमेंटमधील लोक आपल्याला तिथे राहू देतील की नाही ही धाकधूक मनात घेऊन त्या आपल्या घरी परतल्या. परंतु, सिडको परिसरातील वरदलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये पोहोचल्यावर जे चित्र त्यांनी पाहिले त्यामुळे त्या पुरत्याच भारावून गेल्या.

सोसायटीत दाखल होताच रहिवाशांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले. यासोबतच त्यांच्या कार्याला सलाम करत कृतज्ञता व्यक्त केली. हे स्वागत पाहून स्वाती वाघ यांच्या डोळ्यातून नकळत आनंदाश्रू ओघळू लागले. तब्बल 45 दिवसांनंतर आपल्या आईला समोर बघितल्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांना कडाडून मिठी मारली. आई मुलांची हे भेट बघून उपस्थितांचे डोळेदेखील पाणावले.

Last Updated : May 8, 2020, 1:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.