ETV Bharat / state

पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरात भाविकांची मांदियाळी... - त्र्यंबक

बारा जोतिर्लिंगांपैकी एक म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिराची ओळख आहे. येथे श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येस त्र्यंबकेश्वरला ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. त्र्यंबक राजाची विधिवत पूजा आणि रुद्राभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्वर
author img

By

Published : Aug 5, 2019, 10:54 AM IST

Updated : Aug 5, 2019, 1:01 PM IST

नाशिक - श्रावण महिना सुरू झाला आहे. महिन्याच्या पहिल्या श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येस त्र्यंबकेश्वरला ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. श्रावणाच्या पहिल्या सोमवारचा पर्वकाल साधण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतील, असा अंदाज गृह‌ित धरून प्रशासन सज्ज झाले आहे. परंतु, दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने पहिल्या सोमवारी भाविकांची गर्दी दरवर्षीपेक्षा कमी असल्याचे दिसुन आले.

पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिराची ओळख आहे. येथे श्रावण महिन्यात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होते. यामुळे भाविकांची संख्या लक्षात घेता नाशिक प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली असून संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच या परिसरातील भारनियमन महिनाभरासाठी रद्द करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून विशेष पथक या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

सोमवारी पहाटे त्र्यंबक राजाची विधिवत पूजा आणि रुद्राभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. संपूर्ण त्र्यंबक नगरी भोलेच्या गजरात दुमदुमुन गेली आहे. अनेक भाविक मंदिरात दर्शन घेत वेगवेगळ्या प्रकारची पूजा करतानाचे चित्र त्र्यंबकेश्वरमध्ये पाहायला मिळाले. आज मंदिर रात्रीपर्यंत भाविकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे.

श्रा‌वण सोमवारसाठी त्र्यंबकेश्वरला जाण्यास नाशिकहुन राज्य परिवहन महामंडळाने ७५ जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला, दुसरा व चौथ्या सोमवारी हे नियोजन केले असून तिसऱ्या सोमवारी गर्दी बघून यात वाढ केली जाणार आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी जवळच्या तीर्थक्षेत्रांवर जाण्यासाठी जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

Intro:श्रावण महिना सुरू झाला असून महिन्याच्या पहिल्या श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येस त्र्यंबकेश्वरला भाविकांची ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे श्रावणाच्या पहिल्या सोमवारचा पर्वकाल साधण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतील, असा अंदाज गृह‌ित धरून प्रशासन सज्ज झाले परतु दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यात संवत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने पहिल्या सोमवारी भाविकाची गर्दी दरवर्षी पेक्षा कमी असल्याच दिसुन आलेBody:बारा जोतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिराची ओळख आहे. श्रावण महिन्यातील भाविकांची संख्या लक्षात घेता नाशिक प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. तसेच या परिसरातील भारनियमन महिनाभरासाठी रद्द करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून विशेष पथक या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. आज पहाटे त्र्यंबक राजाची विधिवत पूजा आणि रुद्राभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. संपूर्ण त्र्यंबक नगरी भोलेच्या गजरात दुमदुमुन गेली आहे. अनेक भाविक मंदिरात दर्शन घेत वेगवेगळ्या प्रकारचे पूजा करतानाचे चित्र त्र्यंबकेश्वरमध्ये पाहायला मिळाले. आज मंदिर रात्रीपर्यंत भाविकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे.Conclusion:श्रा‌वण सोमवारसाठी त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी नाशिकहुन राज्य परिवहन महामंडळाने जादा ७५ बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला, दुसरा व चौथ्या सोमवारी हे नियोजन केले असून तिसऱ्या सोमवारी वाढणारी गर्दी बघून यात वाढ केली जाणार आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी जवळच्या तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी जादा बसची व्यवस्था केली आहे.
Last Updated : Aug 5, 2019, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.