नाशिक: नाशिकच्या जुना आडगाव नाक्यावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात भाविकांचे श्रद्धा स्थान आहे. हे 250 वर्ष जुने पेशवेकालीन मंदिर आहे. संकटात असलेल्या भाविकांचे संकट श्री पंचमुखी हनुमान दूर करतात, अशी भाविकांची मान्यता असल्याने रोज या मंदिरात भाविकांचे गर्दी असते.
पंचमुखी हनुमान मंदिर: धार्मिक अध्यात्मिक नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे. तर याच नाशिकमध्ये बारा वर्षांनी एकदा कुंभमेळा भरतो. नाशिक शहरात लहान मोठे अशी जवळपास दोन हजारहून अधिक मंदिर आहे. मंदिरची नगरी म्हणून देखील नाशिक ओळखले जाते. पंचवटी परिसरातील जुन्या आडगाव नाक्यावर अडीचशे वर्षे जुने पेशवेकालीन श्री पंचमुखी हनुमान मंदिर आहे. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची स्थापना केली होती. सुरुवातीला लहान असलेले या मंदिराला आता भव्य रूप प्राप्त झाले आहे. दर शनिवारी या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते तसेच दररोज देखील नित्यनेमाने भाविक दर्शन घेत असतात.
पंचमुखी हनुमान का म्हणतात? : पंचमहाभूते किंवा शरीरातील प्राण, अपान, व्यान, उदान व समान या वायुपंचकाचे प्रतीक म्हणूनही वायुपुत्र हनुमान या पंचमुखरूपाची उपासना केली जाते. हनुमंताच्या सर्वस्पर्शी, दैवी व्यक्तिमत्वाला सर्वार्थाने व्यक्त करणारे असे हे पंचमुखी रूप आहे. हनुमानाजी म्हणजे बुद्धी, शक्ती तसेच भक्ती यांचे मूर्तिमंत रूप आहे.
धार्मिक कार्यक्रम होतात: श्री पंचमुखी हनुमान मंदिरातर्फे दर शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. दर पोर्णिमेला सुंदरकांड पाठ, रामायण पाठ तसेच होम हवनाचे कार्यक्रम होतात. कार्तिक मासात दानधर्म करण्याची प्रथा असल्याने भाविक श्रद्धेने दान करतात. यासोबतच पूर्णाहुती, भंडारा असे कार्यक्रम संपन्न होतात. यात अखंड श्रीरामचरित्र मानस पाठासाठी अकरा ब्रह्मवृंद असून ते दिवसरात्र रामचरित्रमानस पाठाचे पठण करतात. भाविक देखील अखंड रामचरित्रमानस पाठाचा लाभ घेत असतात, असे महंत भक्तिचरणदास हे सांगतात.
नवसाला पावणारे हनुमान: मी गेल्या पंचवीस वर्षापासून रोज या हनुमान मंदिरात येतो. नवसाला पावणारे हनुमान आहेत. गेल्या वर्षभरापूर्वीच या मंदिराचा जिर्णोद्धार झाला. या ठिकाणचे महंत भक्ती चरणदास महाराज हे दर पौर्णिमेला येथे कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम घेऊन महाप्रसादाचा वाटप करत असतात. या ठिकाणी आल्यावर प्रसन्न वाटत असल्याचे भाविक सांगतात.
हनुमाजींचा चमत्कार: श्री पंचमुखी हनुमान मंदिर हे जागृत स्थान आहे. काही दिवसापूर्वी मंदिराच्या बाजूला असलेल्या हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाच्या मेंदूचे ऑपरेशन झाले. त्याची पत्नी आणि मुलगा या ठिकाणी हनुमानजींच्या दर्शनासाठी आले होते. तेव्हा मी त्यांना हनुमानजींचा शेंदूर दिला आणि त्याचा त्यांना चांगला फायदा झाला. रुग्ण बोलत नव्हते तर ते बोलायला लागले, असे अनेक भाविकांना चांगले अनुभव आले आहे. ज्यावेळेस भाविक नवस पुर्तीसाठी या ठिकाणी येतात तेव्हा आम्हाला कळते की त्यांनी नवस केल्याचा त्यांना फायदा झाला आहे, असा हनुमानजींचा प्रताप असल्याचे मंदिराचे सेवक त्यागी बाबा यांनी सांगितले.
हेही वाचा: Omkareshwar Temple Pune: पेशवेकालीन साम्राज्याचा इतिहास सांगणारे पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर; 50 वर्षांपूर्वीच स्त्री पौरहित्याकडून रुद्रयाग विधी करणारे मंदिर