ETV Bharat / state

ऑक्सिजन एक्सप्रेस नाशकातील देवळाली मालधक्का येथे दाखल - Oxygen Express Nashik News

महाराष्ट्रासाठी प्राणवायू घेऊन येणारी ऑक्सिजन एक्सप्रेस देवळाली मालधक्का येथे दाखल झाली आहे. या एक्सप्रेसच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, रेल्वे प्रशासन व प्रादेशिक परिवहन विभागाच्या समन्वयाने नियोजन केले होते. ही एक्सप्रेस आता नाशिकमध्ये दाखल झाली आहे.

Oxygen Express Nashik News
ऑक्सिजन एक्सप्रेस नाशिक बातमी
author img

By

Published : Apr 24, 2021, 10:20 AM IST

Updated : Apr 24, 2021, 11:20 AM IST

नाशिक - महाराष्ट्रासाठी प्राणवायू घेऊन येणारी ऑक्सिजन एक्सप्रेस देवळाली मालधक्का येथे दाखल झाली आहे. या एक्सप्रेसच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, रेल्वे प्रशासन व प्रादेशिक परिवहन विभागाच्या समन्वयाने नियोजन केले होते. ही एक्सप्रेस आता नाशिकमध्ये दाखल झाली आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - 'केंद्र सरकारच्या पाया पडण्यापेक्षा राज्य सरकारने नियोजन करणे गरजेचे'

या ऑक्सिजन एक्सप्रेसमधून नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी दोन ऑक्सिजन टँक पुरवण्यात येणार आहेत. या एक्सप्रेस मार्फत प्राप्त होणारा ऑक्सिजन हा नाशिक जिल्ह्यातील ऑक्सिजन तुटवडा भरून काढण्यास मदत करणार आहे. गेल्या काही दिवसांत नाशिकला 85 मेट्रिक टन ऑक्सिजन ऐवजी 56 मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाले होते. त्यातील तफावत आज मिळालेल्या 50 मेट्रिक टन ऑक्सिजन टँकरमुळे भरून निघणार आहे. प्राप्त होणारा ऑक्सिजन एकाच दिवसात वापरून संपण्या ऐवजी, ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प आहे, तेथे या ऑक्सिजनचा साठा करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. जेणेकरून अत्यावश्यक वेळी साठवून ठेवण्यात आलेल्या या ऑक्सिजनचा वापर करणे शक्य होईल.

हेही वाचा - नाशिक हॉस्पिटलमध्ये अशी झाली ऑक्सिजन गळती, बघा सीसीटीव्ही व्हिडिओ

Last Updated : Apr 24, 2021, 11:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.