नाशिक - जागतिक महिला दिनानिमित्त आज नाशिकमध्ये राईट विथ प्राईज या संकल्पनेतून वुमन ऑफ विस्डम या महिलांच्या सामूहिक वॉव ग्रुपने महिलांच्या दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत तेराशेहून अधिक महिला हेल्मेट परिधान करून सहभागी झाल्या होत्या. यावेळी नाशिकचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना आर्थिक मदत करण्यात आली.
या रॅलीमध्ये महिला पारंपरिक वेशभूषा, भरजरी पैठणी, नऊवारी, सलवार - कुडता नवयुगातील टी-शर्ट, जॅकेट आणि जीन्सचा पेहराव करून सामाजिक संदेश देत बाईक रॅलीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. ठक्कर डोम या परिसरातून पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील आणि परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली. रॅली शहरातील ठक्कर डोम मार्गने कॉलेज रोड, कॅनडा कॉर्नर, गंगापूर रोड मार्गे महात्मानगर कार्यक्रमाच्या ठिकाणी आली.
महिलांचे हक्क,बेटी बचाव ,कौटुंबिक अत्याचार, आरोग्य या विषयावर महिलांना प्रबोधन करण्यात आले. या रॅलीत मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वजणी सहभागी झाले होत्या. गाडीची उत्तम सजावट, आकर्षक वेशभूषा, सामाजिक संदेश देण्यासाठी काही वेगळे पण जपणाऱ्या बाइकर्णीनां विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या रॅलीसाठी वॉव ग्रुपच्या अश्विनी न्याहाराकर, विद्या मुळाने, रेखा देवरे, अर्चना बोथरा करुणा बागडे रेखा मस्के मीनाक्षी आहेर यानी परिश्रम घेतले.