ETV Bharat / state

नाशिक : कोरोनाबाधित रुग्णांना भेटायला जाणाऱ्या नातेवाईकांवर होणार गुन्हे दाखल

कोरोनाचा प्रादुर्भाव हा दुप्पट वेगाने होत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. असे असताना आता कोरोनाबाधित रुग्णांना भेटायला जाणारे नातेवाईकच सुपर स्प्रेडर ठरत असल्याचे समोर येत आहे. आता अशा नातेवाईकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

order to fine relatives of corona patient by nashik municipal corporation
नाशिक : कोरोनाबाधित रुग्णांना भेटायला जाणाऱ्या नातेवाईकांवर होणार गुन्हे दाखल
author img

By

Published : Apr 27, 2021, 5:05 PM IST

Updated : Apr 27, 2021, 5:17 PM IST

नाशिक - कोरोनाबाधित रुग्णांना भेटण्यासाठी जाणारे नातेवाईकच शहरात सुपर स्प्रेडर म्हणून फिरत असल्याचे समोर आल्याने आता कोविड रुग्णालयात रुग्णांना भेटायला जाणाऱ्या नातेवाईकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी काढले आहेत.

प्रतिक्रिया

बधितांना भेटायला जाणारे नातेवाईक सुपर स्प्रेडर -

नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव हा दुप्पट वेगाने होत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेसोबतच सर्वसामान्य नागरिकदेखील भीतीच्या वातावरणात वावरत आहे. असे असताना आता कोरोनाबाधित रुग्णांना भेटायला जाणारे नातेवाईकच सुपर स्प्रेडर ठरत असल्याचे समोर येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांना जेवण देण्यासाठी तसेच इतर कारणांसाठी हे नातेवाईक रुग्णांना भेटतात आणि त्यानंतर शहरात ते फिरत असल्याने यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता, आता अशा नातेवाईकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला आहे.

नातेवाईकांना एक हजार रुपयांचा दंड -

सुरुवातीला अनावश्यकपणे रुग्णालयातील आवारात आढळून येणाऱ्या नातेवाईकांना 1 हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. मात्र, यानंतरदेखील ते पुन्हा आढळून आल्यास त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी काढले आहेत. शहरातील झाकीर हुसेन बिटको रुग्णालयासह जवळपास सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांचे नातेवाईक वावरताना आढळून येतात. यातील अनेक जण हे रुग्णांनादेखील भेटत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे अशा बेजबाबदार नातेवाईकांवर महानगरपालिका युक्तांनी काढलेल्या आदेशामुळे लगाम बसण्यासोबतच प्रादुर्भावदेखील नियंत्रणात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा - दिलासा! नागपुरात बाधितांच्या तुलनेत बरे झालेले रुग्ण अधिक

Last Updated : Apr 27, 2021, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.