नाशिक - गेल्या 70 वर्षांपासून अमावस्याच्या दिवशी बंद असलेला कांदा लिलाव सुरू झाला आहे. येवल्यातील बाजार समितीत आज अमावस्याच्या दिवशी कांदा खरेदी करण्यात आला.
हेही वाचा - 'राजकिय रॅलींना परवानगी, मग गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकाला का नाही?'
70 वर्षांनंतर अमावस्याच्या दिवशी कांदा लिलाव
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 70 वर्षांपासून अमावस्याच्या दिवशी कधीही कांद्याचे लिलाव होत नव्हते. मात्र, ही परंपरा खंडित करत 70 वर्षांनंतर प्रथमच अमावस्याच्या दिवशी कांदा लिलाव घेण्यात आला. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या आदेशानुसार अमावस्याच्या दिवशीसुद्धा कांद्याचे लिलाव सुरू ठेवावे. त्या आदेशाचे पालन करत बाजार समितीने आज अमावस्याच्या दिवशीसुद्धा कांदा लिलाव सुरू ठेवला. तसेच, यापुढे देखील कांद्याचे लिलाव हे अमावस्याच्या दिवशी होणार असल्याची माहिती बाजार समितीने दिली आहे. अमावस्याच्या दिवशी कांद्याच्या लिलावास व्यापारींनीसुद्धा सहमती दर्शवली.
कामगार येत नसल्याने लिलाव बंद असायचे
ज्यावेळेस येवला कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली, त्यावेळेसपासून अमावस्येला कांदा लिलाव बंद होता. कारण की अमावस्येच्या दिवशी बाजार समितीमध्ये कोणताही कामगार कामास येत नसल्याने लिलावास आलेले कांदे कसे घ्यावे, असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडायचा. त्यामुळे, कोणताही कामगार अमावस्येच्या दिवशी बाजार समितीत येत नसल्याने अमावस्येच्या दिवशी लिलाव बंद ठेवण्यात येत होते.
हेही वाचा - लिलावात टोमॅटो न घेतल्याने शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप; टोमॅटो रस्त्यावर फेकले