नाशिक - परतीच्या पावसाने द्राक्ष बागेचे नुकसान झाल्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील शेतकरी संजय भास्करराव देशमुख यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेऊन सांत्वन केले व स्वतःच्या वैयक्तिक खात्यातून कुटुंबियांना एक लाखाचा धनादेश दिला.
हेही वाचा - संजय राऊत यांनी केलेल्या आरोपात तथ्य - राजन भोसले
विशेष म्हणजे राज्यातील अथवा केंद्रातील एकही मंत्र्याने या कुटुंबाला भेट दिलेली नाही. मात्र सर्वात प्रथम रामदास आठवले यांनी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्याचप्रमाणे कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्याचे आश्वासनही आठवले यांनी दिले आहे.
यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद जाधव, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष शांताराम बागुल आदी उपस्थित होते