ETV Bharat / state

नाशिकमध्ये म्यूकरमायकोसिसचे 180 रुग्ण, 8 जणांचा मृत्यू - नाशिक म्यूकरमायकोसिस बातमी

कोरोना पाठोपाठ म्यूकरमायकोसिसचा धोका वाढत असल्याने खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत या आजाराचे 180 रुग्ण आढळून आले आहे.

180 mucormycosis patient found in nashik
नाशिकमध्ये म्यूकरमायकोसिसचे 180 रुग्ण, 8 जणांचा मृत्यू
author img

By

Published : May 21, 2021, 7:44 PM IST

नाशिक - जिल्ह्यात आता कोरोना पाठोपाठ म्यूकरमायकोसिसचा धोका वाढत असल्याने खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत या आजाराचे 180 रुग्ण आढळून आले असून यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया

148 जणांवर उपचार सुरू -

जिल्हा कोरोनाच्या थैमानातून सावरत असताना जिल्ह्याला म्यूकरमायकोसिसने आपल्या विळख्यात घेतले आहे. कोरोना उपचारादरम्यान केल्या जाणाऱ्या औषध उपचारांमुळे म्यूकरमायकोसिस हा भयावह आजार होत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत या आजाराचे जवळपास 180 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या 148 जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे.

आत्तापर्यंत 200 इंजेक्शनचे वाटप -

म्यूकरमायकोसिसचे 122 रुग्ण खासगी, तर 16 अधिग्रहित कोविड सेंटरमध्ये दाखल असून 34 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या म्यूकरमायकोसिसच्या एम्फोटेरेसीन बी या 200 इंजेक्शनच वाटप आत्तापर्यंत करण्यात आले आहे. मात्र, कोरोना पाठोपाठ नाशिक शहर आणि मालेगाव हे म्यूकरमायकोसिसचे हॉटस्पॉट ठरत असल्याने नागरिकांपाठोपाठ प्रशासनाच्यादेखील काळजीत भर पडली आहे. म्यूकरमायकोसिसने बाधीत झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी करू नये, इंजेक्शन हे हॉस्पिटलच्या मागणीनुसार नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका, नाशिक ग्रामीण असे विभागानुसार वितरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - शिवभोजन थाळी आता १४ जूनपर्यंत मोफत, उद्दीष्टामध्येही दीडपट वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.