ETV Bharat / state

हॉटेलची भिंत कोसळून एकाचा मृत्यू, एक जखमी

नाशिक मालेगाव येथील चाळीसगाव फाटा येथे जोरदार पाऊस झाला आहे. या पावसात येथील 'एकता हॉटेल'चा पुढचा भाग कोसळा. या घटनेत एकजणाचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाला आहे.

हॉटेलची भिंत कोसळून एकजणाचा मृत्यू, एकजण जखमी

author img

By

Published : May 29, 2021, 8:36 PM IST

नाशिक - नाशिक मालेगाव येथील चाळीसगाव फाटा येथे जोरदार पाऊस झाला आहे. या पावसात येथील 'एकता हॉटेल'चा पुढचा भाग कोसळा. या घटनेत एकाजणाचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाला आहे.

हॉटेलची भिंत कोसळून एकजणाचा मृत्यू, एकजण जखमी

ढिगाऱ्याखाली आणखी कर्मचारी अडकल्याची शक्यता

हा पाऊस वादळी-वाऱ्यासह कोसळला. त्यामध्ये या 'एकता हॉटेल'चा पुढचा भाग कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशामक दल, पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेदरम्यान, हॉटेलमध्ये ग्राहकांसह, कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. हॉटेलच्या कोसळलेल्या भिंतीखालून एका व्यक्तीचा मृतदेह काढला असून, एकजण जखमी झाला आहे. मात्र, हॉटेलमध्ये कितीजण होते, किती जखमी झाले, कोणाचा मृत्यू झाला, हे चित्र आणखी स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा - '..तर लक्षद्वीपमधील असंतोषाचे परिणाम देशाला भोगावे लागतील'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.