ETV Bharat / state

संततधार पावसाने जुना वाडा कोसळला; नाशिक येथील घटना

नाशिक येथे सुरु असलेल्या संततधार पावसाने दुमजली वाडा कोसळला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कोसळलेला वाडा
author img

By

Published : Jul 7, 2019, 8:04 PM IST

नाशिक - संततधार पावसाने दुमजली वाडा कोसळल्याची घटना जुने नाशिक परिसरातील भोई गल्ली येथे घडली. रविवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेत अग्निशामक दलाने तत्परता दाखवल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. वाड्यात राहणाऱया तीन कुटूंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

संततधार पावसाने जूना वाडा कोसळला

जुने नाशिक परिसरात भोई गल्ली येथे कांबळे यांचा दुमजली वाडा आहे. वाड्यामध्ये तीन कुटूंबे राहत होती. सध्या नाशिक शहरात संततधार पाऊस सुरु आहे. या सततच्या पावसाने तो वाडा पुर्णत: भिजला. सकाळपासून वाडा थरथरत असल्याने येथील रहिवासी आधीच सतर्क झाले होते. मात्र वाड्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले नव्हते. त्यामुळे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलातील जवानांनी वाड्याची पाहणी केली. व प्रसंगावधान राखत तात्काळ त्या तीनही कुटूंबियांना वाड्याबाहेर काढले आणि सुरक्षित स्थळी हलवले. व काही वेळातच वाड्याची एक बाजू वेगाने खाली कोसळली.

पंधरा दिवसापूर्वी जुन्या नाशकातील संभाजी चौकातही वाडा कोसळल्याची घटना घडली होती. तसेच काजीपुरा भागातील धोकादायक असलेली वाड्याची भिंत मनपा कर्मचाऱयांनी शनिवारी उतरून घेतले. जुन्या नाशिक भागात अनेक धोकादायक जुने वाडे असून महानगरपालिकेने त्यांना वाडा खाली करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. मात्र वाडा मालक आणि भाडेकरीच्या वादामुळे वाडा खाली केला जात नाही.

Intro:जुने नाशकतील जुना वाडा कोसळला,अग्नीशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवित हानी टळली..

Body:जुने नाशिक परिसरातील भोई गल्ली मधील दुमजली कांबळे वाडा संततधार पावसाने पूर्णतः भिजला होता,रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वाड्याची एक बाजू कोसळली,काल रात्री पासून नाशिक मध्ये होत असलेल्या संततधार पावसामुळे वाडा कमकुवत झाला होता,सकाळपासून वाडा थरथरत असल्याने रहिवाशांनी सतर्क झाले होते मात्र त्यांनी वाड्यातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले नव्हते,अशात अग्निशामक दलाचे जवान त्या ठिकाणी दाखल होउन त्यांनी वाड्याची पूर्ण पाहणी करून प्रसंगावधान दाखवत वाड्यातील तीन कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले.आणि काही वेळातच वाड्याची एक बाजू वेगाने खाली कोसळली...संभाव्य धोका ओळखून तात्काळ रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम अग्निशामक दलाने दाखवल्याने सुदैवाने जीवित हानी टळली...

पंधरा दिवसांपूर्वी जुन्या नाशकातील संभाजी चौकात वाडा कोसळल्याची घटना घडली होती, या घटनेनंतर काजीपुरा भागात धोकादायक झालेल्या एक बंद वाड्याची भिंत मनपा पूर्व विभागाच्या कर्मचाऱ्याने शनिवारी उतरून घेतली..जुन्या नाशिक भागात अनेक धोकादायक जुने वाडे असून महानगरपालिकेने त्यांना वाडा खाली करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत,मात्र वाडा मालक आणि भाडेकरीच्या वादा मुळे वाडा खाली केला जात नाही ही वस्तुस्थिती आहे..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.