ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट: नाशकात रक्तदात्यांची संख्या 40 टक्क्यांनी घटली - नाशिक रक्तपिशवी तुटवडा न्यूज

महाविद्यालये, धार्मिक स्थळे बंद असून अनेक कंपन्यांमध्ये कमी कामगारांना घेऊन काम होत आहे. त्यामुळे नाशिकच्या औद्योगिक भागात, महाविद्यालयात आणि धार्मिक स्थळांमध्ये होणारी रक्तदान शिबिरे सध्या बंद आहेत. याचा परिमाण रक्त पुरवठ्यावर झाला आहे.

Blood Bag
रक्तपिशवी
author img

By

Published : Aug 1, 2020, 3:40 PM IST

नाशिक - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून जनमानसात याचे अनेक परिणाम झाले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ऐच्छिक रक्तदात्यांवर याचा परिणाम झाला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेकजण रक्तदान करण्यासाठी पुढे येत नसल्याने रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. दररोज 40 ते 50 जणांना रक्त पिशवी मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.

कोरोनाच्या भीतीने रक्तदात्यांच्या संख्येत घट झाली आहे

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 13 हजारांवर गेला असून आत्तापर्यंत 499 जणांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन काळात बंद असणारे व्यवसाय, उद्योग अद्याप पूर्णपणे पूर्वपदावर आलेले नाहीत. महाविद्यालये, धार्मिक स्थळे बंद असून अनेक कंपन्यांमध्ये कमी कामगारांना घेऊन काम होत आहे. याचाही परिमाण रक्तदात्यांवर झाला आहे. नाशिकच्या औद्योगिक भागात, महाविद्यालयात आणि धार्मिक स्थळांमध्ये होणारी रक्तदान शिबिरे सध्या बंद आहेत. याचा परिमाण रक्त पुरवठ्यावर झाला आहे.

नाशिकमधील सर्वात जुनी रक्तपेढी असलेल्या 'अर्पण रक्तपेढीत' दर महिन्याला रक्तदानाच्या माध्यमातून 2 हजार 400 ते 2 हजार 500 रक्तपिशव्या जमा होत असत. मात्र, मागील तीन महिन्यापासून याठिकाणी 500 ते 600 रक्तपिशव्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रोज 40 ते 50 जणांना रक्त पिशवी मिळाली म्हणून परत फिरावे लागत आहे. A निगेटिव्ह, B निगेटिव्ह, AB निगेटिव्ह आणि O निगेटिव्ह गटाच्या रक्तपिशवींचा तुटवडा अधिक आहे.

प्लाझ्माचाही जाणवू शकतो तुटवडा -

नाशिक जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून पावसाळा सुरू झाल्यावर डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होत असते. यावर्षी अद्याप नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव आटोक्यात आहे. मात्र, भविष्यात पावसाचा जोर वाढल्यावर डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्तपिशवीसोबत डेंग्यू रुग्णांवर उपचारा दरम्यान लागणाऱ्या प्लाझ्माचा देखील तुटवडा दिसून येत आहे.

रक्तदात्यांनो पुढे या रक्तदान करा -

कोरोनाला न घाबरता ऐच्छिक रक्तदात्यांनी रक्तदान करण्यास रक्तपेढीत यावे. शासन नियमांचे पालन करत सामाजिक संस्थानी कमीत-कमी नागरिकांना बोलावून रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन रक्तपेढ्यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.