नाशिक - जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असला तरी यंदा नाताळ सण सध्या पद्धतीने साजरा होणारा आहे. नाताळात 65 वर्षावरील व 10 वर्षा आतील मुलांना चर्चमध्ये बंदी घालण्यात आली आहे. तसेच शहरातील ख्रिस्ती प्रार्थनास्थळांमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी देखील ख्रिस्ती प्रार्थनास्थळाच्या प्रमुखांकडून घेतली जाणार आहे.
कोरोनामुळे यंदा नाशिकमध्ये ख्रिश्चन बांधवांचा सर्वात मोठा सण नाताळ हा सध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. नाताळ उत्सवाच्या काळातील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमावर मर्यादा घालण्यात आली आहे. यंदा नाताळात 65 वर्षावरील आणि 10 वर्षाच्या आतील मुलांना चर्चमध्ये दर्शना बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्यासाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था चर्च मार्फत करण्यात आली आहे. चर्च मध्ये गर्दी टाळण्यासाठी नाशिक मधील सर्वच चर्च व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. नाताळा दरम्यान हस्तांदोलन करता येणार नाही, तसेच तीन फुटवरून एकमेकांना शुभेच्छा देता येतील. कोरोना बाबत शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार असल्याचे ख्रिश्चन धर्मगुरूंनी सागितले.
चर्चमध्ये येताना सर्वच भाविकांचे टेम्प्रेचर घेतले जाणार आहे. तसेच चर्च बाहेर हँड सॅनिटाईझ करूनच भाविकांना चर्च मध्ये प्रवेश दिला जाणार आहे. सर्व भाविकांना मास्क वापराने अनिवार्य करण्यात आले आहे. व्यक्तीमध्ये कमीत कमी तीन फुटांचे अंतर राहील, अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळी गर्दी टाळण्यासाठी टप्या टप्याने भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. आसन क्षमतेच्या 25 टक्के भाविकांना एका वेळी दर्शन आणि प्रार्थना करता येणार आहे.
यंदा प्रसाद मिळणार हातावर..
चर्च मध्ये आलेल्या भाविकांना धर्मगुरू हे ख्रिस्त प्रसाद जीभेवर देतात. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रसाद हा भाविकांना हातावर दिला जाणार आहे. तसेच चर्चमध्ये जे बांधव येशू ख्रिस्ताच्या पायावर चुंबन घेऊन प्रार्थना करतात. त्यांना यंदा तो क्षण अनुभवता येणार नाही, त्यांना दुरूनच दर्शन घ्यावे लागणार असल्याचे फादर अरुण शिंदे यांनी सांगितले आहे.
गरिबांना मदत करून साजरा करणार नाताळ-
सर्वच ख्रिश्चन बांधव नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो, त्यासाठी आर्थिक खर्च देखील मोठ्या प्रमाणत केला जातो. परंतु यंदा कोरोनाचे संकट आल्याने सामाजिक उपेक्षित गरीब गरजू नागरीक आहेत. अशांना वैयक्तिक आणि चर्चच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय धर्मगुरूंनी घेतला आहे. तसेच आदिवासी भागात आरोग्य शिबीर घेऊन त्यांना वैद्यकीय साहित्य दिले जाणार आहे.