नाशिक - जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (3 जुलै) 24 तासात तब्बल 280 संशयित रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सर्वाधिक 180 रुग्ण हे नाशिक शहरातील आहे. एका दिवसात जिल्ह्यात कोरोनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस नाशिक शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वाढत असून नाशिककरांची चिंता वाढली आहे. शहरात अनलॉक सुरू असून सर्वत्र व्यवसाय सुरू आहेत.
शहरातील मुख्य बाजार पेठेत नागरिक सुरक्षीत अंतर राखत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम अधिक कडक करत, दुकाने सुरू ठेवण्यासाठी वेळ निश्चित केली आहे. तसेच मास्क न वापरणारे, 5 पेक्षा जास्त जण रस्त्यावर उभे राहून चर्चा करणे, दुचाकीवरून डबल सीट प्रवास करणे अशा व्यक्तींवर पोलीस कारवाई करताना दिसून येत आहे.
शुक्रवारी आढळलेले कोरोना रुग्ण -
नाशिक ग्रामिण - 82
नाशिक मनपा - 188
मालेगाव - 10
एकूण - 280
नाशिक जिल्ह्याची आतापर्यंतची परिस्थिती
- नाशिक जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्ण 4864
- कोरोनामुक्त - 2747
- एकूण मृत्यू -262
- एकूण उपचार घेत असलेले रुग्ण-1855
- नवीन संशयित -650