ETV Bharat / state

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी राष्ट्रवादीचे नेते स्थानबद्ध

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेच्या सांगता सभेसाठी नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्याने शहरात कोणत्याही प्रकारचे आंदोलन होऊ नये, यासाठी भाजपच्या दबावतंत्रामुळे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांना आज सकाळपासून अंबड पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करून ठेवले होते.

स्थानबद्ध करण्यात आलेले कार्यकर्ते
author img

By

Published : Sep 19, 2019, 10:46 PM IST

नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेच्या सांगता सभेसाठी नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्याने शहरात कोणत्याही प्रकारचे आंदोलन होऊ नये, यासाठी भाजपच्या दबावतंत्रामुळे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांना आज सकाळपासून अंबड पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करून ठेवले होते.

सभा आटोपल्यानंतर सर्व नेते मार्गस्थ झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना सोडण्यात आले. नाशिक शहरात काढलेल्या महाजनादेश यात्रेदरम्यानही या पदाधिकाऱ्यांना ताब्यात ठेऊन यात्रा संपल्यावर त्यांना सोडण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांकडून दत्तक नाशिकला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने विरोधक आक्रमक झाले होते. महाजनादेश यात्रा व सांगता सभेवेळी आंदोलन, घोषणाबाजी असे प्रकार होऊ नये यासाठी भाजप सरकारकडून पोलिसांवर दबाव टाकत राष्ट्रवादीतील नेते व पदाधिकारी यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, शहर सरचिटणीस संजय खैरनार, प्रांतिक सदस्य मुख्तार शेख, संतोष सोनपसारे, युवती शहराध्यक्ष किशोरी खैरनार, योगेश दिवे, पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गीते, देवळाली विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे, विभाग अध्यक्ष मकरंद सोमवंशी, नाशिक तालुका उपाध्यक्ष सुनील कोथमिरे, अमोल नाईक, विशाल डोखे, राहुल कमानकर, चेतन देशमुख, धनंजय भालेराव, पुष्पाताई राठोड, नेहा सोनवणे, वैशाली तायडे, बबिता सोनवणे, मीरा काळे, अलका आहेर, अक्षय परदेशी, रविंद्र शिंदे, धनंजय भावसार, सुमित अहिरे, शेखर बोडाइत, शेखर पाटील, रोहन गव्हाणे, शुभम नेरकर, यशोदीप पाटील, बाळासाहेब साबळे, उमेश चव्हाण, प्रशांत नवले आदींना ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्यात आले होते.

Intro: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेच्या सांगता सभेसाठी नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्याने भाजपच्या दबावतंत्रामुळे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांना आज सकाळ पासून अंबड पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करून ठेवले.Body:भाजपा पक्षाने काढलेल्या महाजनादेश यात्रेची सांगता सभा आज नाशिक शहरात आयोजित करण्यात आली होती. या सभेकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्याने शहरात कुढल्याहि पध्दतीचे अदोलन होऊ नये या करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील नेते व पदाधिकाऱ्यांना अंबड पोलीस ठाणे येथे सकाळ पासून स्थानबद्ध केले होते.Conclusion:सांगता सभा आटोपल्यानंतर सर्व नेते मार्गस्थ झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना सोडण्यात आले. नाशिक शहरात काढलेल्या महाजनादेश यात्रेदरम्यान हि या पदाधिकाऱ्यांना अटक करून यात्रा संपल्यावर त्यांना सोडण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांकडून दत्तक नाशिकला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने विरोधक आक्रमक झाले. महाजनादेश यात्रा व सांगता सभेवेळी आंदोलन, घोषणाबाजी असे प्रकार होऊ नये याकरिता भाजपा सरकार कडून पोलिसांवर दबाव टाकत राष्ट्रवादीतील नेते व पदाधिकारी यांना अटक कडून पोलीस स्टेशन येथे स्थानबद्ध करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, शहर सरचिटणीस संजय खैरनार, प्रांतिक सदस्य मुख्तार शेख, संतोष सोनपसारे, युवती शहराध्यक्ष किशोरी खैरनार, योगेश दिवे, पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गीते, देवळाली विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे, विभाग अध्यक्ष मकरंद सोमवंशी, नाशिक तालुका उपाध्यक्ष सुनील कोथमिरे, अमोल नाईक, विशाल डोखे, राहुल कमानकर, चेतन देशमुख, धनंजय भालेराव, पुष्पाताई राठोड, नेहा सोनवणे, वैशाली तायडे, बबिता सोनवणे, मीरा काळे, अलका आहेर, अक्षय परदेशी, रविंद्र शिंदे, धनंजय भावसार, सुमित अहिरे, शेखर बोडाइत, शेखर पाटील, रोहन गव्हाणे, शुभम नेरकर, यशोदीप पाटील, बाळासाहेब साबळे, उमेश चव्हाण, प्रशांत नवले आदींना अटक करून स्थानबद्ध करण्यात आले होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.