नाशिक - जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ,सुरगाणा, इगतपुरी या चार तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल घोषित होत असून आतापर्यत चारही तालुक्यात राष्ट्रवादीची सरशी ( NCP is leading in Gram Panchayat elections ) आहे. त्या पाठोपाठ मार्क्स कम्युनिस्ट पक्ष शिवसेना, भाजप, काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती मिळते आहे.
त्र्यंबकेश्वर - नाशिक त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दहा जागांचे निकाल लागले असून आतापर्यंत राष्ट्रवादी आघाडीवर आहे. तर दोन जागांवर शिंदे गटाने विजय मिळवला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळे ग्रामपंचायतीत शिंदे गटाची सरशी झाली आहे. शिंदे गटाच्या देवचंद पाटील यांचा विजय झाला आहे.तर रोहिले व माळेगाव ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने विजय मिळवला आहे. रोहिले येथील रतन खोडे यांची सरपंचपदी निवड झाली आहे.
इगतपुरी - नाशिक इगतपुरीत आवलीदु या ग्रामपंचायतीवर कॉग्रेसने विजय मिळवला आहे. तर अडसरे खू येथील ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गटाने विजय मिळवला आहे. तसेच कऱ्होले ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी,भावली बु ग्रामपंचायतीवर मनसे तसेच तर भरवज ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
सुरगाणा - सुरगाणा तालुक्यात मार्क्स कम्युनिस्ट पक्ष आघाडीवर असून त्यांनी आतापर्यंत 12 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे,यात करंजुल ग्रामपंचातीवर माकपच्या प्रभाबाई राठोड यांची सरपंच पदी निवड झाली आहे. तसेच आंबठा पोहाडी ग्रामपंचायतीवर माकपने विजय मिळवला आहे.पोहाडी सरपंचपदी सुनिता दळवी,अंबाठा सरपंचपदी चौरे हरी महारू,तर डोल्हारे सरपंचपदी राष्ट्रवादीचे राजेंद्र गावित विजयी झाले आहेत.
पेठ - नाशिकच्या पेठ तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर,12 जागांवर राष्ट्रवादी,10 जागावर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत,नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील 69 पैकी 23 ग्रामपंचायतीचे निकाल घोषित झाले असून 12 जागांवर राष्ट्रवादी तर 1 जागेवर शिवसेना तसेच दहा जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.