ETV Bharat / state

शौर्य सैनिकांचे अन् हे स्वतःची पाठ थोपटवतायत - शरद पवार - शरद पवारांची भाजपवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बागलाण विधानसभा मतदारसंघातील सटाणा येथील प्रचार सभेत भाजपवर जोरदार टीका केली. भाषणात त्यांनी कांदा निर्यात बंदी, भारतीय लष्कराने केलेल्या कारवाई यांचा उल्लेख करत भाजपला धारेवर धरले.

शरद पवार
author img

By

Published : Oct 18, 2019, 9:13 AM IST

नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बागलाण विधानसभा मतदारसंघातील सटाणा येथील प्रचार सभेत भाजपवर जोरदार टीका केली. भाषणात त्यांनी कांदा निर्यात बंदी, भारतीय लष्कराने केलेल्या कारवाई यांचा उल्लेख करत भाजपला धारेवर धरले.

कांद्याच्या किमती वाढल्या की भाजप व त्यांचे मित्र पक्ष ओरडतात "प्याज की वजहसे दो समय का खाना मुश्कील हो गया है" काय सकाळ, दुपार, संध्याकाळ कांदाच खातात की काय? भाजी, पोळी, भात, भाकरी खाता की नाही? असा सवाल करीत शरद पवार यांनी सटाणा येथील प्रचार सभेत भाजप सरकारवर जोरदार टीकास्र सोडले.

हेही वाचा - भाजप-शिवसेनेचे हे 'रमण राघव' सरकार , राज ठाकरेंचा माहीम येथील प्रचारसभेत घणाघात

पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळ भारतीय हवाई दलाने उद्ध्वस्त केले. याला देश हितासाठी आम्ही पाठिंबा दिला. भारतीय हवाई दलाने हल्ले केले, आणि गंमतीची गोष्ट म्हणजे अमित शाह म्हणतात ५६ इंचच्या छातीमुळे हे झाले. हवाई हल्ला करायला मोदी, शाह गेले नव्हते, अशी उपरोधात्मक टीकाही पवारांनी आपल्या भाषणात केली. या उलट पाकिस्तानचे कंबरडे मोडून त्यांचे तुकडे केले आणि बांगलादेश तयार झाला. यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीनी संसदेत लष्कराबद्दल अभिमान असल्याचे सांगत, भारतीय सैन्यासमोर नतमस्तक होत असल्याचे म्हटले, जे काही घडले ते केवळ सैन्याच्या शौर्यामुळे घडल्याचे सांगितले, आणि हे स्वतःचीच पाठ थोपटून घेत असल्याचा जोरदार टोला भाजपला पवारांनी लगावला.

हेही वाचा - कष्टकरी, शेतकरी यांच्या मुळावर उठलेले सरकार पाडा- शरद पवार

आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कधी नव्हे ते दोन पैसे मिळणार होते. मात्र, कांद्यावर निर्यातबंदी आणून शेतकऱ्यांना मिळणारे दोन पैशेही या सरकारने रोखले, म्हणून या सरकारला मते मागण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी सांगितले.

Intro:कांद्याच्या किंमती वाढल्या की भाजप व त्यांचे मित्र पक्ष ओरडतात "प्याज की वजहसे दो समय का खाना मुश्कील हो गया हे" काय सकाळ, दुफार, संध्याकाळ कांदाच खातात की काय? भाजी,पोळी, भात, भाकरी खातात की नाही? असा सवाल करीत राष्टवादी कॉंगेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी बागलाण विधानसभा मतदार संघातील सटाणा येथील प्रचार सभेत भाजप सरकारवर जोरदार टीकास्र सोडले.Body:पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळ भारतीय हवाई दलाने उध्वस्त केले. याला देश हितासाठी आम्ही पाठींबा दिला. भारतीय हवाई दलाने हल्ले केले, आणि गंमतीची गोष्ट म्हणजे अमित शहा म्हणतात ५६ इंचच्या छातीमुळे हे झाले. हवाई हल्ला करायला मोदी,शहा गेले नव्हते. अशी सडकून टीका हि पवारांनी आपल्या भाषणात केली.. या उलट पाकिस्तान चे कंबरडे मोडून त्याचे तुकडे केले. आणि बांगलादेश तयार झाला. यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीनी पार्लमेंट मध्ये सैन्या बद्दल अभिमान असल्याचे सांगत, भारतीय सैन्या समोर नतमस्तक होत असल्याचे म्हटले, जे काही घडले ते केवळ सैन्याच्या शौर्यामुळे घडल्याचे सांगितले. आणि हे स्वतःचीच पाठ थोपटून घेत असल्याचा जोरदार टोला भाजपला पवारांनी लगावला.
आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कधीनव्हे ते दोन पैशे मिळणार होते. मात्र कांद्यावर निर्यातबंदी आणून शेतकऱ्यांना मिळणारे दोन पैशेही या सरकारने रोखले म्हणून या सरकारला मतं मागण्याचा अधिकार नाही असे त्यांनी सांगितले.
Conclusion:महोदय
रात्री दोन बातम्या सविस्तर पाठवल्यात 1 1 गॅस्ट्रोची 85 जणांना लागण दोघांच्या मृत्यू
2 शरद पवारांची सभा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.