ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : नाशकातील अनेकांनी रद्द केली उमरा यात्रेची तिकिटे - मदिना

कोरोनामुळे सौदी अरेबियाने पर्यटकांचे प्रवेश निषिद्ध केल्याने नाशकातून मक्का व मदिना येथे उमरासाठी जाणाऱ्या अनेक मुस्लींम बांधवानी त्यांची तिकीटे रद्द केली आहेत.

मदिना
मदिना
author img

By

Published : Mar 10, 2020, 7:00 PM IST

Updated : Mar 10, 2020, 7:29 PM IST

नाशिक - चीनसोबत आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव इतर देशातही होत आहे. याचा परिणाम सर्वत्र जाणवत आहे. नाशकातून मक्का, मदीना येथे धार्मिक यात्रेसाठी (उमरा) जाणाऱ्या मुस्लीम बांधवांसह हज-उमराह टूर्स चालकांना बसला आहे.

नाशकातील अनेकांनी रद्द केली उमरा यात्रेची तिकिटे

सौदी अरेबिया सरकारने मागील आठवड्यात विदेशातून नागरिकांना अनिश्चित काळासाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेद सौदी अरेबिया दूतावासाकडून जारी केलेला उमरा आणि पर्यटनासाठीचा व्हीसा अनिश्चित काळासाठी देणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून उमरा यात्रेसाठी जाणाऱ्या तब्बल 500 हून अधिक यात्रेकरूंनी आपली तिकिटे रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे रमजान महिन्याच्या तिकिट आरक्षणावरही याचा परिणाम झाला असून त्याचीही तिकिटे बंद झाली आहे.

कोरोना आटोक्यात आल्यानंतर प्रवासासाठी परवानगी दिली जाईल, असे सौदी सरकारने स्पष्ट केले आहे. भारतासह चीन, जपान, बांगलादेश, पाकिस्तान, कोरिया, इराण ,फिलीपिन्स आदी देशाच्या नागरिकांवर ही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नाशकातून उमरा जाणाऱ्या पाचशेहून अधिक प्रवाशांना आपली यात्रा रद्द करण्याची वेळ आली आहे.

सौदी अरेबियाने ही बंदी अनिश्चित कालावधीसाठी लादल्याने पुढील आगाऊ आरक्षण करून घ्यायचे की नाही, असा प्रश्न पर्यटन व्यवसायिकांना पडला आहे. जर कोरोना लवकर नियंत्रणात आला नाही तर याचा परिणाम हज यात्रेवरही पडण्याची भीती व्यवसायिकाने व्यक्त केली आहे. तिकिटे रद्द झाल्याचा फटका ट्रॅव्हल्ससह पर्यटन व्यवसायिकांना बसला आहे.

हेही वाचा - नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा संशयित रुग्ण; जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

Last Updated : Mar 10, 2020, 7:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.