ETV Bharat / state

Sudhakar Badgujar Nashik: ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना दीड वर्षाची शिक्षा, 'हे' आहे कारण..

नाशिकचे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यासह तीन जणांना शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी नाशिकच्या न्यायालयाने दीड वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या गाडीत शस्त्र आढळली होती. पोलीस चौकशीला आल्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत वाद घातला होता. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Sudhakar Badgujar Nashik
ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर
author img

By

Published : Feb 16, 2023, 9:54 AM IST

Updated : Feb 16, 2023, 2:20 PM IST

नाशिक : नाशिकमध्ये सध्या उद्धव ठाकरे सेना आणि एकनाथ शिंदे गटात तीव्र राजकीय संघर्ष सुरू आहे. ठाकरे गटातील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी हे शिंदे गटात दाखल झालेत,आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शिवसेनेसाठी धक्का मानला जातो. त्यामुळे ठाकरे सेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना ठोठावण्यात आलेली शिक्षा चर्चेचा विषय ठरत आहे. नाशिक लोकसभा निवडणुक 2014 मध्ये शासकीय कामकाजात अडथळा आणल्याने पोलिसांनी बडगुजर यांच्या विरोधात खटल्या दाखल केला होता.

काय घडलं होत : शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह राकेश शिरसाट, ज्ञानेश्वर बडगुजर या तिघांवर न्यायालयाने आरोप ठेवत दीड वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2014 मधे सिडको येथील लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू असताना केंद्रावर गर्दी झाली. यावेळी राजकीय पक्षाच्या समर्थकांत वाद होण्याची शक्यता असल्याने, पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला.

दंडासह दीडवर्षाची शिक्षा : यावेळी मतदान केंद्रावर माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या सहकाऱ्यांनी तात्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त हेमराज राजपूत यांच्यासोबत वाद घातला, अरेरावी केली. यातून शासकीय कामकाजात अडथळा आणला असा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याचा निकाल नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दिला असून सुधाकर बडगुजर यांच्यासह दोघांना दीड वर्ष वर्षाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कोण आहेत सुधाकर बडगुजर : सुधाकर बडगुजर हे नाशिकमधील आक्रमक आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात. सन 2007 पासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आहे. 2007 मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 14 जून 2008 रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला होता. अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे बडगुजर यांच्याकडे पक्षाने 2009 ते 2012 अशी तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृह नेतेपद सोपविले होते. त्यानंतर महापालिकेची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर 2012 ते 2015 अशी तीन वर्षे बडगुजर यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले होते. 2014 मध्ये त्यांना पक्षाने नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती.

हेही वाचा : Jitendra Awhad On Eknath Shinde : आसामच्या मुख्यमंत्र्यावरुन एकनाथ शिंदे सरकारवर हल्ला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गप्प का?

Last Updated : Feb 16, 2023, 2:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.