नाशिक: नाशिक- सिन्नर महामार्गावरील शिंदे- पळसे टोल नाक्यावर पाच ते सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. यात एसटी बसने दोन वाहनांना धडक दिली. ही धडक भीषण होती. त्यात 3 जणांचा मृत्यू झाला तर अपघातानंतर एसटी बसने पेट घेतला आहे.
एसटी कारवर धडकली: विशेष म्हणजे पेट घेतला होता, तेव्हा बसमध्ये प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. कार चालक अचानक थांबल्याने दोन एसटी कारवर धडकले आहे. त्यात दोन ते तीन बाईकमध्ये अडकले. अपघातानंतर बसने पेट घेतला. पेट घेतलेली एसटी राजगुरू नगर आगाराची आहे.
बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात: बसचे ब्रेक फेल झाल्याने बसने 3 ते 4 जणांना चिरडले आहे. अपघातात चार ते पाच जणांचा हाेरपळू मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समाेर येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
उपचारासाठी दाखल: सिन्नर महामार्गावर एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी घडली. सध्या इथे बचावकार्य सुरू आहे. या अपघातात १० ते १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.