नाशिक - शिवजन्मोत्सव निमित्ताने, तांबे आणि पितळ याचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य 70 किलो वजनाच्या टाकची निर्मिती करण्यात आली आहे. या टाकेची नोंद लवकरच वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार असल्याचा दावा छत्रपती सेनेने केला आहे.
शिवजन्मोत्सव : नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 70 किलो वजनाचा भव्य टाक - Chhatrapati shivaji maharaj 70 kg tak in nashik
शिवजन्मोत्सव निमित्ताने, छत्रपती सेनेतर्फे शिवजन्मोत्सव, 'शिवराय मनामनात, शिवराय घरा घरात' या संकल्पनेतून तांबे आणि पितळ याचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य 70 किलो वजनाचा टाकची निर्मिती करण्यात आली आहे. टाक बनवण्याचे काम मागील दोन महिन्यांपासून सुरू होते.
शिवजन्मोत्सव : नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 70 किलो वजनाचा भव्य टाकाची निर्मिती
नाशिक - शिवजन्मोत्सव निमित्ताने, तांबे आणि पितळ याचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य 70 किलो वजनाच्या टाकची निर्मिती करण्यात आली आहे. या टाकेची नोंद लवकरच वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार असल्याचा दावा छत्रपती सेनेने केला आहे.
सलग तिसऱ्या वर्षी विक्रम होणार
नाशिकच्या छत्रपती सेनेतर्फे 2019 मध्ये भव्य असा 18 घड्यांचा 13 फूट आणि 11 फूट परिघाचा जिरेटोप साकारण्यात आला होता. 2020 मध्ये भव्य अशी 130 किलो वजनाची भवानी तलवार साकारण्यात आली होती. आता 2021 मध्ये भव्य दिव्य 70 किलो वजनाचा टाकची निर्मिती करण्यात आली आहे.
हा टाक शुभरूषी व मूर्तिकार विश्वनाथ संगमनेरकर बंधू यांनी साकारला आहे. छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, निलेश शेलार, तुषार गवळी, राजेश संदीप निगळ, डॉ. श्याम थविल, किशोर तिडके, जितेंद्र आहिरे, धीरज खोळंबे, अविनाश पाटील, डॉ. विशाल गवळी, ऋतुजा काकडे, डॉ. सोनाली गवळी आदींनी परिश्रम घेतले.