नाशिक - गुन्हेगारांना सुधारण्याची संधी आम्ही देत आहोत. जन्मजात कुणीही गुन्हेगार नसतो. परिस्थितीनुसार ते गुन्हेगारीत अडकले जातात. मात्र कुणाला सुधारायचे असेल व चांगला नागरिक बनायचे असेल तर त्यांना संधी आवश्यक आहे. नाशिक शहराला गुन्हेगारीपासून मुक्त करायचे आहे, असे पोलीस उपायुक्त पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी म्हटले आहे.
गुन्हेगारीचे दोन प्रकार, भावनेच्या आधारे व नियोजनाबद्दल गुन्हे -
अंबड औद्योगिक वसाहत येथे आयोजित गुन्हेगार सुधार योजना मेळावा प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस आयुक्त बोलत होते. पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून अंबड सातपूर व इंदिरा नगर पोलिसांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. गुन्हेगारीचे दोन प्रकार असतात भावनेच्या आधारे व नियोजनबद्ध गुन्हे, त्यात कोणता गुन्हेगार कशाप्रकारे गुन्हेगार होतो हेही लक्षात घेतले जाते. नाशिक शहरातील संघटित गुन्हेगारीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला असून लवकरच याची अंमलबजावणी करणार असल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सांगितले आहे.
नंतर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल झाले नाहीत तर त्यांच्यावरील गुन्हे रद्द केले जातील -
इतर गुन्हेगारांसोबत आपले नाव येते. यामुळेही नकळत अनेक व्यक्ती गुन्ह्यात अडकल्या जातात मात्र ज्यांना खरोखर चांगला व्यक्ती व्हायचा आहे. त्यांना सुधारण्याची आम्ही संधी देतो आहोत. फक्त संधीच नाही तर त्यांना नोकरी-व्यवसायासाठी ही मदत करीत आहोत. त्यांना लागणारे बँकेचे लोन याचीही जबाबदारी पोलिस घेणार आहेत. गुन्हेगारांनी ही दर महिन्याला पोलिसांना भेटून ते काय करतात? याचे रिपोर्ट द्यावे लागतील आणि खरोखरच पूर्वीचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींवर नंतर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल झाले नाहीत तर त्यांच्यावरील गुन्हे रद्द केले जातील. याची सुरुवात अंबडमधून केली असून शहरात सगळीकडे हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती आयुक्त पांडेय यांनी दिली. यावेळी पोलीस उपायुक्त विजय खरात, संजय बारकुंड, सहाय्यक पोलीस आयुक्त नवलनाथ तांबे, सोहेल शेख यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, किशोर मोरे, निलेश मानकर हे उपस्थित होते. यावेळी प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.