ETV Bharat / state

सुवर्ण योजनेद्वारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या आडगावकर सराफविरोधात गुन्हा - Adgaonkar Jewellers in cheating case

मिरजकर सराफानंतर आडगावकर सराफ पेढीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे  सराफ पेढीकडून चालवण्यात येणाऱ्या सुवर्ण योजना किती सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आडगावकर सराफ पेढी
आडगावकर सराफ पेढी
author img

By

Published : Jun 26, 2020, 2:11 PM IST

नाशिक - सुवर्ण योजनेद्वारे आडगावकर सराफाकडून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. योजनेची मुदत संपल्यानंतर अनेक महिने उलटूनही गुंतवणूकदारांना त्यांच्या रकमेचे दागिने किंवा पैसेही परत मिळाले नाहीत. याप्रकरणी सरकार वाडा पोलीस ठाण्यात आडगावकर सराफ पेढीचे संचालक महेश आडगावकर आणि गोकुळ आडगावकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मिरजकर सराफानंतर आडगावकर सराफ पेढीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे सराफ पेढीकडून चालवण्यात येणाऱ्या सुवर्ण योजना किती सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील आडगावकर सराफ विरोधातात 31 गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या आहेत. ‘सुवर्णसंधी' व ‘दूरदृष्टी' योजनेच्या नावाखाली आडगावकर सराफ पेढीने 17 लाख रुपये व सुमारे साडेसहाशे ग्रॅम सोन्याची फसवणूक केली आहे. प्रवीण दत्तात्रय जोशी (रा. पवननगर, सिडको) यांच्या तक्रारीवरून आडगावकर सराफ प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक महेश राम आडगावकर व गोकुळ श्‍याम आडगावकर यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे.

सराफ बाजार भागात असलेल्या आडगावकर सराफ पेढीने ग्राहकांचा चांगला विश्वास संपादन केला होता. काही वर्षांतच त्यांनी व्यवसायाचा विस्तार करीत शहरातील कॅनडा कॉर्नर, सिडको, नाशिक रोड आदी भागांत शाखांचा विस्तार केला. आडगावकर सराफ पेढीने सर्वच ठिकाणी भव्य शोरुम सुरू केले होते.

गोकुळ आडगावकर कुटुंबीयांसह पसार

‘सुवर्णसंधी' व ‘दूरदृष्टी' योजनेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. मात्र जानेवारीला योजनेची मुदत संपूनही ग्राहकांना त्यांचे पैसे मिळत नाही. त्यासाठी गुंतवणूकदार जानेवारीपासून आडगावकर सराफाच्या तिन्ही दुकानांमध्ये गर्दी करीत होते. त्यावेळी पोलिसांनी लेखी तक्रारीचे आवाहन केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आडगावकर याच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यावेळी लोकमान्यनगरमधील गोकुळ आडगावकर कुटुंबीयांसह काही दिवसांपूर्वीच पसार झाले आहेत. तर महेश आडगावकर यांना पक्षाघाताचा झटका आल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बॅंक खाती आणि मालमत्तेची चौकशी होणार..
आर्थिक गुन्हे शाखेने आडगावकर यांचे बॅंक खाते असलेल्या बॅंकांकडे पत्रव्यवहार करून त्यांचे आर्थिक व्यवहार रोखले आहेत. त्यांच्या बँकेतील खात्यांविषयी माहिती संकलित केली जात आहे. त्याचप्रमाणे आडगावकरांची मालमत्तेसंदर्भातील जिल्हा निबंधक कार्यालयाकडे कोणतेही व्यवहार होऊ नये, यासाठी पाठपुरावा केला जात आहे. फसवणुकीची व्याप्ती मोठी असण्याची शक्‍यता आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. फसवणूक झालेल्या इतरही तक्रारदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.