ETV Bharat / state

नाशिकमध्ये 70 टक्के बाजारपेठा बंद; नागरिक मात्र रस्त्यावर

author img

By

Published : Mar 13, 2021, 4:21 PM IST

नाशिक जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रोज कोरोनाचे एक हजाराच्यावर नवीन रुग्णांची भर पडत असून 6 हजाराहुन अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी दुकानाबाबत निर्बंध कडक केले असून जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकानांना सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नाशिक
नाशिक

नाशिक - जिल्ह्यात कोरोना वाढता प्रादुर्भाव बघता जिल्हा प्रशासनाने शनिवार आणि रविवार ह्या दिवशी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याला दुकानदारांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, दुसरीकडे वाहतूक व्यवस्था सुरू असल्याने नागरिक रस्त्यावर दिसून आल्याने अंशतः टाळेबंदी किती यशस्वी होईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नाशिक

नाशिक जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रोज कोरोनाचे एक हजाराच्यावर नवीन रुग्णांची भर पडत असून 6 हजाराहुन अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी दुकानाबाबत निर्बंध कडक केले असून जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकानांना सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शनिवारी आणि रविवारी पूर्ण दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून याला दुकानदारांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. मात्र, दुसरीकडे वाहतुकीवर कुठलेही निर्बंध नसल्याने नागरिकांची नेहमी प्रमाणे रस्त्यावर वर्दळ दिसून आल्याने प्रशासनाने केलेली अंशतः टाळेबंदी किती यशस्वी होईल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हॉटेल, बार मात्र सुरू

नाशिक जिल्ह्यात करण्यात आलेल्या अंशतः टाळेबंदीमध्ये अर्थचक्र सुरू राहावे ह्यासाठी प्रशासनाने दवाखाने, मेडिकल, हॉटेल, बार, चहा, मांस विक्री, भाजी विक्री दुकाने, स्वीट मार्ट दुकांना सूट देण्यात आल्याने शहरातील 30 टक्के दुकाने सुरू असल्याचे दिसून आले. तर मुख्य बाजारपेठेत 70 टक्के दुकाने बंद असल्याचे चित्र होत.

हॉटेलमध्ये निर्बंध पाळले जातात का?

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना प्रशासनाने दुकानांवर निर्बंध घातले आहे. मात्र ह्यातुन हॉटेल व्यावसायिकांना वगळण्यात आलं आहे. हॉटेल मध्ये होणाऱ्या गर्दी वर महानगरपालिका लक्ष ठेवणार का असा प्रश्न दुकानदारांनी उपस्थित केला आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना महानगरपालिकेने कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या तपासण्या करणं गरजेचं असतांना त्या होत नसल्याचे दुकानदार व माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांनी म्हटलं आहे.

4 हजार रुग्ण गृह विलगीकरणात

नाशिक शहरामध्ये कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून दररोज चारशे ते पाचशे नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडत आहे. नाशिक मध्ये आज 4924 एक्टिव्ह रुग्ण असून त्यातील 4 हजार रुग्ण हे होम क्वांरटाइन आहेत.तसेच आतापर्यंत शहरात 85 हजार 799 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 1061 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.होम क्वांरटाइन रुग्ण घराबाहेर पडत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाला प्राप्त होत असून अशा नागरिकांवर नाशिक महानगरपालिकेने कारवाई करावी असे मत सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.