येवला (नाशिक) - येवला तालुक्यातील ममदापूर येथील कुंभार कारागिराने कोणताही साच्या न वापरता हाताने आपल्या कलागुणांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शोभेच्या वस्तू व घरात वापरण्यासाठी लागणारी गरजेचे वस्तू बनविल्या आहेत. वाल्मीक नामदेव शिरसाठ या होतकरू दहावी शिक्षण झालेल्या व आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून माती व त्यावर प्रक्रिया केलेल्या मातीच्या साह्याने डोळ्यांचे पारणे फिटेल असा मातीच्या भांडे व शोभेच्या वस्तू बनविल्या आहेत.
सणावारासाठी लागणारे वस्तू व घरांसाठी सजावटीसाठी शोभून दिसेल अशा शोभेच्या अनेक वस्तू हातांनी आकार देऊन चांगली वस्तु बनवले आहे. यामध्ये बंगल्यासाठी झुंबर, व घरात वापरण्यासाठी ग्लास, वाटी, तांब्या, फुलपात्र, कुकर, चमचा, दही व ताक यासाठी भांडी एक लिटरचे माप, भाजीसाठी पातेलं, दिवाळी सणासाठी व नवरात्रीसाठी देवीचे घट अशा अनेक वस्तू मातीपासून व माती व प्रक्रिया करून तयार केलेल्या विशिष्ट भांड्यांचा आकार देऊन मातीच्या वस्तू त्यांनी बनवले आहे.
पुढे नवरात्र व दिवाळी सण असल्याने व वापरासाठी लागणाऱ्या वस्तू बनवण्याकडे कारागीर सध्या व्यस्त असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. सध्या सर्वत्र कोरोना महामारी असल्यामुळे बाजार बंद असल्यामुळे त्याचा फटका हा कुंभार कारागिरांना सुद्धा बसला आहे. या भांड्यांना येवला, कोपरगाव, शिर्डी, नाशिक, वैजापूर, अशा ठिकाणी मागणी आहे. परंतु सध्या कोरोनामुळे कुंभार कारागिरांना या वस्तू विक्रीसाठी फटका बसला आहे. शिरसाठ यांना खादी ग्राम उद्योग या संस्थेने नासिक येथे दहा दिवसाचे प्रशिक्षण घेऊन व कारागीर यांना माती मळणी यंत्र शंभर टक्के अनुदानावर दिल्याने कुंभार कारागिरांना असल्या वस्तू बनवण्यासाठी आवड निर्माण झाली. या वस्तूतून त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर व आपल्या हातानी चिखलाला योग्य असा आकार देऊन वाल्मीक शिरसाठ यांनी डोळ्याचे पारणे फिटेल असे शोभेच्या वस्तू बनविले आहेत.
कुंभार कारागिरांचा व्यवसाय सण उत्सव यावर अवलंबून असतो. नवरात्र व दिवाळी सणासाठी घटी, पणत्या हे बनवले आहे. या वस्तू पाच रुपये पासून ते दोन हजार रुपये पर्यंत किमतीला विकली जात आहे. या शोभेच्या वस्तू व घरगुती वापरासाठी मातीच्या वस्तू बनविल्या आहेत. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे बंद बाजारपेठेचा फटका बसलेला दिसून येत आहे.