ETV Bharat / state

नाशकातील औद्योगिक संघटनांचा 'जनता कर्फ्यूला' पाठिंबा; तीन लाखांपेक्षा जास्त कामगारांना मिळणार सुट्टी

सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीतील सर्व संघटनांनी जनता कर्फ्यूला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 22मार्चला औद्योगिक वसाहत क्षेत्रातील सुमारे साडेतीन हजारांपेक्षा जास्त युनिट बंद ठेवण्यात येणार आहेत. यात 3 लाखांपेक्षा जास्त कामगारांना सुट्टी देण्याचा निर्णय या औद्योगिक संघटनांनी घेतला आहे.

Nashik Industrial Association
नाशिक औद्योगिक संघटना
author img

By

Published : Mar 21, 2020, 1:28 PM IST

नाशिक - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला संबोधित करत 22मार्चला संपूर्ण भारतात 'जनता कर्फ्यु' पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील बहुतांशी ठिकाणी जमाव बंदी लागू केली आहे. याला सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीतील सर्व उद्योजकांनी पाठिंबा दिला आहे.

नाशकातील औद्योगिक संघटनांचा 'जनता कर्फ्यूला' पाठिंबा

सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीतील सर्व संघटनांनी जनता कर्फ्यूला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 22मार्चला औद्योगिक वसाहत क्षेत्रातील सुमारे साडेतीन हजारांपेक्षा जास्त युनिट बंद ठेवण्यात येणार आहेत. यात 3 लाखांपेक्षा जास्त कामगारांना सुट्टी देण्याचा निर्णय या औद्योगिक संघटनांनी घेतला आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या प्रभावात राज्याची उपराजधानी लॉक डाऊन

भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या २५८ वर गेली आहे. यामध्ये ३८परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हरियाणा राज्यात सर्वात जास्त म्हणजे १४ परदेशी नागरिकांना आणि तेलंगाणात ९ जणांना लागण झाली आहे. आज(शनिवारी) राजस्थानात ६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.