ETV Bharat / state

Nashik Drug Case : एमडी ड्रग्जनंतर युवा पिढीला 'या' व्यसनाचा विळखा? जाणून घ्या धोके - नशेसाठी होतोय औषधाचा वापर

Nashik Drug Case : नाशिकमध्ये पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोहीम सुरू केली असून ठिकठिकाणी अमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. मात्र, असे असतानाच आता एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. एमडी ड्रग्ज सहज उपलब्ध होत नसल्यानं नशेबाज युवक आता नशा करण्यासाठी चक्क खोकल्याच्या औषधाचा वापर करत असल्याचं समोर आलंय. तसंच मागील वर्षीपेक्षा गेल्या काही दिवसांत खोकल्याच्या औषधांची मागणी वाढत असल्याचंही सांगण्यात येतंय.

Use of cough syrup for intoxication by youth due to non availability of MD drugs
एमडी ड्रग्ज न मिळाल्यानं नशेसाठी होतोय खोकल्याच्या औषधाचा वापर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 8:21 AM IST

डॉ.वृषाली व्यवहारे

नाशिक Nashik Drug Case : मुंबई पोलिसांनी ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा नाशिकमधील एमडी ड्रग्जचा कारखाना उद्धवस्त केल्यानंतर नाशिक पोलीसदेखील सक्रिय झाल्याचे पाहायला मिळतंय. नाशिक पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या प्रकरणात एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या 12 जणांना अटक करण्यात आलं. तसंच शहरातील 9 कॉफी शॉपमध्ये युवक-युवती अमली पदार्थांचं सेवन करत असल्याचं समोर येताच हे कॉफी शॉप सील करण्यात आले.

काही प्रमाणात अमली पदार्थांचा व्यवसाय करणारे घरात बसून आहेत. मात्र, दुसरीकडे बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर सर्दी खोकल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यानुसार केमिस्टकडे खोकल्याच्या औषधांचा खपही वाढला आहे. हा खप वाढण्यामागचे कारण केवळ सर्दी खोकला नसून याचा औषध म्हणून कमी तर नशेसाठी अधिक वापर होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकानं विविध प्रकारच्या खोकल्याच्या औषधांचा लाखोंचा साठा जप्त केला. उच्चभ्रू तरुणांमध्ये खोकल्याच्या औषधाची मागणी वाढली असून पार्टीमध्ये याचा सर्रास वापर होत आहे. अमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. शहर व परिसरातील औषध विक्रेत्यांवरदेखील पोलिसांचं लक्ष राहणार आहे.

नशेची किक बसते : नाशिकच्या स्थानिक पोलीस तसंच अमली पदार्थ विरोधी पथकांनं ड्रग्स पुरवण्याविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केल्यानं सहज ड्रग्ज मिळणं कठीण झालंय. त्यामुळं नशेबाज तरुण, तरूणींनी प्रतिबंधित औषधाचा डोस घेण्याकडे मोर्चा वळवलाय. केमिस्टकडे खोकल्याचं औषध हे प्रिस्क्रिप्शनशिवाय सर्वाधिक विक्री होणारं औषध आहे. गेल्या वर्षीपेक्षा काही दिवसात या औषधांच्या मागणीत दुपटीनं वाढ झाली आहे. छोट्या पार्ट्यांमध्ये याचा नशेसाठी वापर केला जातोय. 13 ते 15 वर्षाचे अल्पवयीन मुलं नशेसाठी 200 ml ची औषधाची बाटली घेतात. ही औषधं तात्काळ परिणाम करत त्यांना अपेक्षित असलेली किक देतात. कोणत्याही ड्रग्ज सौम्य डोसप्रमाणे या औषधामुळं शरीराला उत्तेजना मिळते, त्यानंतर धुंदी येते. औषधाच्या सेवनानंतर मेंदूची विचारशक्ती काही वेळासाठी मंदावते. मेंदुवरील नियंत्रण हरवल्याचा भास होतो.

दुर्गंधी येत नाही : कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज घेतले तर त्याची किंमत हजाराच्या पटीत असते. त्या तुलनेत कफ सिरपची औषधं खूप स्वस्त असतात. तसंच दारू किंवा ड्रग्जप्रमाणे दुर्गंधी येत नाही. त्यामुळं नशा केल्यानंतर आजूबाजूच्या तसंच घरच्यांनादेखील याची माहिती होत नसल्यानं तरुणांमध्ये हा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. किशोरवयीन मुलांच्या पार्ट्यांमध्येदेखील याचा सर्रास वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

जीवावर बेतणारी नशा : दरम्यान, खोकल्याच्या औषधांमध्ये कोडिनचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं हे औषध जास्त प्रमाणात घेतल्यावर नशा येते. सध्या तरुण,तरुणी नशा करण्यासाठी या खोकल्याच्या औषधाचा वापर करतात. वैद्यकीयदृष्ट्या बघितलं तर जास्त प्रमाणात ही औषध घेणं घातक ठरू शकतं. वारंवार या औषधांच सेवन केल्यानं थेट मेंदूवर परिणाम होऊन तो व्यक्ती कोमात जाऊ शकते. अथवा त्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो. त्यामुळं पालकांन देखील आपल्या मुलांकडं बारकाईनं लक्ष देण्याची गरज असल्याचं डॉक्टर डॉ. वृषाली व्यवहारे यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. Nashik Drug Case : ड्रग्ज प्रकरणानंतर नाशिक पोलीस सतर्क; परदेशी विद्यार्थ्यांची कसून तपासणी
  2. Devendra Fadnavis : ड्रग्स माफियाला कोणाचा पाठिंबा? ललित पाटील प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा
  3. Nashik Crime : ड्रग्ज प्रकरणातील मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर पोलिसांना जाग, १३ कॉफी शॉपला ठोकलं टाळं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.