नाशिक - नाशिक जिल्ह्यात नव्या रूग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण तिप्पटीने वाढले आहे. जिल्ह्यात गुरुवारी (13 मे) 7,518 जण कोरोनामुक्त झाले तर 2,276 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. यामुळे नव्या रूग्णांपेक्षा बरे होण्याच्या प्रमाणात तिप्पटीने वाढ झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम दिसू लागला असून मागील चार दिवसांपासून बाधित रूग्णांचा आकडा कमी होत असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. नाशिक जिल्ह्यात मागील 15 दिवसांपूर्वी कोरोनाबधितांचा आकडा 46 हजारावर जाऊन पोहोचला होता. या काळात जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी हॉस्पिटलचे बेड रूग्णांनी भरून गेल्याने इतर रूग्णांना बेड मिळणे मुश्कील झाले होते. त्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे अतोनात हाल झाले होते. तसेच या काळात आरोग्य यंत्रणादेखील हतबल झाल्याचे चित्र होते. मात्र मागील महिन्याभरापासून नाशिकमध्ये कडक निर्बंध लागू केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाली असून 46 हजारांवर पोहचलेला रूग्णांचा आकडा 20 हजारांवर येऊन पोहचला आहे. त्यामुळे शहरातील हॉस्पिटलमधील बेड देखील रिकामे झाले आहेत. तसेच प्रशासनाने देखील लवकरात लवकर नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यास सुरूवात केल्याने पुढील काही दिवसात कोरोनाबधितांचा आकडा नक्कीच कमी होईल, असा विश्वास आरोग्य विभागाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थिती..
-आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्ण - 3 लाख 64 हजार 748
-कोरोनामुक्त - 3 लाख 40 हजार 51
-मृत्यू - 4004
-उपचार घेत असलेले रुग्ण - 20 हजार 693
नाशिक जिल्ह्यात नव्या रूग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण तिप्पटीने वाढले
नाशिक जिल्ह्यात नव्या रूग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण तिप्पटीने वाढले आहे. जिल्ह्यात गुरुवारी (13 मे) 7,518 जण कोरोनामुक्त झाले तर 2,276 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. यामुळे नव्या रूग्णांपेक्षा बरे होण्याच्या प्रमाणात तिप्पटीने वाढ झाली आहे.