नाशिक - जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासला होता. अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासू नये, याकरता जिल्ह्यात प्रशानाच्या वतीने 32 ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत.
यामध्ये नाशिक जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या प्लांटची क्षमता दोन मेट्रिक टन आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होणार असून, ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.
जिल्ह्यातील इतर ऑक्सिजन प्लांटच्या कामाला देखील सुरुवात
जिल्हाभरातील इतर रुग्णालयांच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे. हे काम देखील लवकरच पूर्ण होईल, अंस आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - धोका वाढला! व्हाइट फंगसमुळे आतड्यात पडले छिद्र; जगातील पहिलीच केस