ETV Bharat / state

Nashik Crime News : पत्नीचा खून करत पतीची आत्महत्या, नेमकं कारण काय? - आडगाव पोलीस

Nashik Crime News : अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनं आपल्या पत्नीची डोक्यात दगडी वरवंटा मारुन खून केल्याची खळबळजनक घटना नाशिक जिल्ह्यातील आडगाव शिवारात उघडकीस आलीय. धक्कादायक म्हणजे पत्नीचा मृत्यू झाल्याचं लक्षात येताच पतीनंही आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय.

अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खुन करत पतीची आत्महत्या
Nashik Crime News
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 9:14 PM IST

अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खुन करत पतीची आत्महत्या

नाशिक Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील आडगाव शिवारात अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने आपल्या पत्नीची डोक्यात दगडी वरवंटा मारून हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. पत्नीचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यानं पतीनंदेखीलआत्महत्या केली. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी आडगाव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Adgaon Crime Update)

अनैतिक संबंधातून खुन : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पत्नी, दीड वर्षाचा मुलगा व आईसह नाशिकमधील आडगाव शिवारात इच्छामणी नगरात राहत होता. गेल्या काही महिन्यांपासून पतीला पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. यामुळं या पती-पत्नींमध्ये कायम भांडण होत होते. मात्र, गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून ही भांडणं मोठ्या प्रमाणात सुरु झाली होती. त्यातच मंगळवारी रात्री अकरा साडेअकराच्या सुमारास या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु झालं. यावेळी रागाच्या भरात पतीनं पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंटा मारला, यात पत्नीचा जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला.

पोलीसांची घटनास्थळी धाव : मंगळवारी आरोपीची आई आपल्या अडीच वर्षाच्या नातवासह बाहेर असलेल्या महादेव मंदिरात जाऊन झोपली होती. बुधवारी सकाळी उठून आरोपीची आई घरी आल्यावर तिला मुलानं आत्महत्या केल्याचं दिसून आलं. तसेच सून रक्ताच्या थारोळ्यात किचनमध्ये पडलेली दिसली. यामुळे भयभीत झालेल्या आईनं आडगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदेंनी पथकासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. आरोपीनं पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंटा टाकून हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. तसंच प्रथमदर्शनी ही घटना अनैतिक संबंधाच्या संशयातून घडल्याचं दिसून येत असल्याचंदेखील पोलिसांकडून सांगितलं जातंय.

प्रेमप्रकरणातून एकाचा खून : नाशिक शहरात दोन दिवसापूर्वी पंचक मलनिसरण केंद्राजवळ कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर आठवड्यापूर्वी पंचक गावातून बेपत्ता झालेल्या ज्ञानेश्वर गायकवाडचा असल्याचं तपासात पुढं आलंय. त्याच्या शरीरावर धारदार हत्यारांनी केलेल्या जखमाही आढळून आल्या होत्या. पोलिसांनी याप्रकरणी संशयित कार्तिक कोमटेची कसून चौकशी केल्यावर कार्तिकनं ज्ञानेश्वरला धारदार शस्त्राने भोसकून ठार मारल्याच समोर आलंय. संशयित कार्तिकचं ज्ञानेश्वरच्या पत्नीवर प्रेम होतं. यातून त्यांना प्रेमात अडथळा ठरत असलेल्या ज्ञानेश्वरचा कार्तिकनं काटा काढल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.

हेही वाचा :

  1. Nashik Crime : पैसे मागितल्याने मामेभावाचा आतेभावावर चाकूहल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद
  2. Nashik Robbery Attack : दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्ध ठार ; सहा लाख लूटले
  3. Nashik Crime: ऑर्थर पाठोपाठ नाशिक कारागृहातील बंदीवानावर अनैसर्गिक अत्याचार, संशयितावर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.