ETV Bharat / state

गंगापूर धरणातून लवकरच विसर्ग सुरु होणार; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - गंगापूर धरण भरले

गंगापूर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील आठ दिवसांपासून पाऊस पडत असल्याने जलाशयामध्ये आजपर्यंत 5173 द.ल.घ.फु. ( 5.13 टि.एम.सी. ) म्हणजेच 91.88 % पाणीसाठा झाला आहे. सद्यस्थितीत पाऊस असाच चालू राहिल्यास पुढील 48 तासांत गोदावरी नदी मध्ये गंगापूर जलाशयात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

Gangapur Dam
गंगापूर धरण
author img

By

Published : Aug 22, 2020, 6:08 PM IST

नाशिक- आठ दिवसांपासून गंगापूर धरणाच्या पाणलोठ क्षेत्रात पाऊस सुरु आहे. पावसामुळे आजपर्यंत धरणा 92 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसात गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात मोठया प्रमाणात विसर्ग करण्यात येण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूर परिस्थिती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आहेत. नदी काठच्या नागरिकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील सतर्क रहण्याच्या सूचना मांढरे यांनी दिल्या आहेत.

गंगापूर धरणातून लवकरच विसर्ग सुरु होणार

गंगापूर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील आठ दिवसांपासून पाऊस पडत असल्याने जलाशयामध्ये आजपर्यंत 5173 द.ल.घ.फु. ( 5.13 टि.एम.सी. ) म्हणजेच 91.88 % पाणीसाठा झाला आहे. सद्यस्थितीत पाऊस असाच चालू राहिल्यास जलाशय परिचालन सूचीनुसार निर्धारीत पाणीपातळी व पाणीसाठा राखण्यासाठी पुढील 48 तासांत गोदावरी नदी मध्ये गंगापूर जलाशयात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. गोदावरी नदीकाठालगतच्या वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करु नये. आवश्यकता वाटल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे. तसेच नदीकाठालगतची इंजिने, विद्युत मोटारी, पशुधन तत्सम साहित्य यांच्याही सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने लघुकृती आराखडा तयार केला असून, त्याद्वारे सूक्ष्म नियोजन करुन अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. टोल फ्री क्रमांक 1077 सुरु करण्यात आला आहे. भविष्यातील संकट आणि पूरपरिस्थिती ओळखून घेत विविध विभागांनी आदर्श उपाययोजनांच्या अंमलबजावणीची प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी देखील स्वत: दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.

पांटबंधारे विभाग....

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६५ से. मी. पेक्षा अधिक पाउस पडत असल्यास तत्काळ सर्व कार्यकारी यंत्रणा, जिल्हा नियंत्रण कक्ष यांना कळविणे. विसर्ग सुरु होण्याआधी आणि त्यानंतर देखील नदीकाठच्या गावांना वेळोवेळी माहिती देणे, अशी महत्तवाची जबाबदारी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दारणा व गोदावरी या नद्यांच्या विसर्गाचा समतोल राखण्यासाठी माहिती देणे आणि पर्जन्याचे वाढते प्रमाण पाहता धरणातून जास्त विसर्ग करायचा असल्यास नदीकाठच्या गावांना त्याबाबत सतर्कतेचा इशारा देणे, आदी जबाबदारी पाटबंधारे विभागकडे देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय...

जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्ष आणि त्यातील जबाबदार अधिकारी संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या संपर्कात राहून पूरपरिस्थितीचा आढावा घेतील. पूरामुळे झालेल्या नुकसानाबाबत माहिती घेणे, बचावपथक आणि सामुग्री घटनास्थळी पोहोचविण्याची जबाबदारी या विभागाकडे सोपवण्यात आली आहे. तसेच वेळोवळी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग यांच्याशी समन्वय साधून बैठक घेणे. शोध व बचाव पथकांचा आढाव घेणे, याशिवाय आकाशवाणीवरुन नागरिकांना पूरपरपरिस्थिती माहिती देणे. या दोन मुख्य विभांगासह विभागीय आयुक्त कार्यालयालादेखील दर दोन तासांना पूर परिस्थितीबाबत माहिती देण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आली आहे.

महानगरपालिका....

पूरक्षेत्रात साधनसामुग्री तयार ठेवणे, अग्निशमन दल, पोहणारे, सुरक्षा रक्षक यांना घटनास्थळी रवाना करणे, वैद्यकीय विभागामार्फत औषधे पुरविणे, पूररेषेतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे आदी जबाबदाऱ्या महापालिकेवर सोपवण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.