कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्त बहीण-भावांना पुस्तके द्या; चिमुकल्यांनी दिले पिगी बँकमधील पैसे - पूरग्रस्तांसाठी पिगीबँक
कोल्हापूर, सांगलीतील महापुरामुळे पुस्तके, वह्या शाळेचे सर्वच साहित्य वाहून गेले. त्या पूरग्रस्त चिमुकल्यांचे हाल बघितले अन् नाशकातील दोन चिमुकले आपल्या पिगीबँकमधील पैसे घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.

नाशिक - कोल्हापूर, सांगलीतील महापुरात आमच्या बहीण-भावांचे वह्या-पुस्तके वाहून गेली. त्यामुळे नाशकातील दोन चिमुकल्यांनी आपल्या पिगीबँकमध्ये साठवलेले पैसे जिल्हाधिकाऱ्याकडे देत आमच्या पूरग्रस्त बहिणी-भावांना पुस्तके घेण्यासाठी द्या, अशी विनंती केली. रक्षाबंधनाला त्यांचे अनोखे प्रेम पाहायला मिळाले.
शहरातील सिडको भागातील चेतना नगर येथे देवरे कुटुंबीय राहते. याच कुटुंबातील तेजस्वी आणि शाहू या दोन चिमुकल्यांनी खाऊ आणि चॉकलेटसाठी पैसे साठवले होते. मात्र, माध्यमातून सातत्याने दाखवण्यात आलेले कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्तांचे हाल त्यांनी बघितले. त्यामुळे त्यांनी खाऊसाठी साठवलेले पिगीबँकमधील पैसे त्यांना देण्याची इच्छा वडील वैभव आणि आई सोनाली देवरे यांच्याजवळ बोलून दाखवली. त्यांनी देखील होकार देत थेट जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. दोन्ही चिमुकल्यांनी आपल्या पिगी बँकमधील पैसे जिल्ह्याधिकारी सुरेश मांढरे यांना दिले. तसेच दोन्ही पूरग्रस्त जिल्ह्यातील बहीण-भावांना पुस्तके घेण्यासाठी पाठवण्याची विनंती केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दोघांचं कौतुक केले.
Body:खाऊ आणि चॉकलेट साठी साठवलेले पैसे पूरग्रस्तांसाठी द्यावे असा विचार मुलांच्या डोक्यात येतो काय, आणि पालकासोबत मुलं थेट जिल्हाधिकारी यांच्या दालनात जाता काय ,असंच काहीसं घडलं आहे नाशिक मध्ये, नाशिकच्या सिडको येथील चेतना नगर भागात राहणारे तेजस्वी आणि शाहू देवरे या भावंडांनी पिगीबँक मध्ये साठवलेले पैसे पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिल्हाधिकार्यांकडे स्वाधीन करत आमच्या सारख्या बहीण आणि भावांना वह्या-पुस्तके घेण्यासाठी पाठवा अशी विनंती करत रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला नवा आदर्श घालून दिला आहे...
सातारा ,सांगली,कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रात पावसाने घातलेल्या थैमानाने लाखो कुटुंब रस्त्यावर आलेत, त्या घरातील चिमुकले, लहान मुलं यांचे अतोनात हाल झाल्याचं चित्र हे सतत माध्यमातून दाखवण्यात आलं हे बघून सिडको येथील चेतना नगर येथे राहणारे अकरा वर्षीय तेजस्वी आणि सहा वर्षाच्या शाहू या दोघा भावंडांनी आपल्या पिगी बँक मधील साठवलेले पैसे त्यांना देण्याचे ठरवले ह्या भावंडांनी याबाबत वडील वैभव आणि आई सोनाली देवरे यांना ह्या बाबत सांगितल्यावर त्यांनी ही होकार दिला आणि नाशिकचे जिल्हाधिकारी सुरेश मांढरे यांच्याकडे पैसे सुपूर्द करत पूरग्रस्त भागात असलेल्या आमच्या सारख्या मुलांना वह्या-पुस्तके घेण्यासाठी पैसे पाठवा अशी विनंती केली, मुलांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीचं जिल्हाधिकाऱ्यांनी देखील कौतुक केलेय..
टीप फीड ftp
nsk piggy bank viu 1
nsk piggy bank byte
nsk piggy bank byte 2
Conclusion: