ETV Bharat / state

नाशिकमध्ये 11 महिन्यांत 143 लाचखोरांना अटक - Superintendent of Police Sharmistha Valawalkar

Action Against Corrupt Employees : नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई करत 11 महिन्यात 143 लोकसेवकांना लाच घेताना रंगेहाथ पकडलंय. यात सर्वाधिक 54 सापळे नाशिकमध्ये टाकण्यात आले आहेत. तसंच महसूल विभागातून सर्वाधिक 34 लाचखोरांना अटक करण्यात आली आहे.

Nashik Anti Corruption Department
Nashik Anti Corruption Department
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 10:45 PM IST

नाशिक Action Against Corrupt Employees : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जोरदार कारवाईचा धडाका सुरू आहे. यावर्षी गेल्या 11 महिन्यात नाशिक परिक्षेत्रात एकूण 143 यशस्वी सापळे रुचून 199 लोकसेवकांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. यातील सर्वाधिक ऑपरेशन्स नाशिक जिल्ह्यात राबवण्यात आले. त्याखालोखाल अहमदनगर जिल्ह्यात 31 सापळे रचण्यात आले.

नाशिकचा राज्यात अव्वल क्रमांक : लाचखोरीत 143 कारवायांसह नाशिकनं राज्यात अव्वल क्रमांक राखला आहे. या 11 महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं राज्यात एकूण 700 कारवाया केल्या आहेत. अहमदनगरमध्ये एका सहाय्यक अभियंत्याला एक कोटी रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलं. लाच घेणाऱ्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यांला निलंबित करण्यात आलं आहे. तसंच या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आला.

निलंबनाच्या पुढे काय? : धक्कादायक म्हणजे, राज्यभरातील 200 हून अधिक भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं नाही. तसंच न्यायालयानं दोषी ठरलेल्या 13 लाचखोरांना अद्याप बडतर्फ देखील करण्यात आलेलं नाहीय.

'या' विभागात सर्वाधिक लाचखोर कर्मचारी : नाशिक परिक्षेत्रात लाचलुचपत विभागानं 11 महिन्यात 143 जणांना लाच घेताना रंगेहात पकडलंय. यात सर्वाधिक नाशिकमध्ये 54, अहमदनगर 31, धुळे 17, नंदुरबार 13, जळगावमध्ये 28 सापळे रचण्यात आले आहेत. यात महसूल विभागात 34, जिल्हा परिषद 13, पोलीस विभागात 27, पंचायत समिती 6, कृषी विभाग 4, सहकार विभाग 6, भूमी अभिलेख विभागात 6 सापळे रचण्यात आले होते.

टीम वर्कमुळं शक्य होतंय : कारवाई करताना सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांना माहिती करून दिली जाते. आवश्यकतेनुसार सर्व अधिकारी कारवाईसाठी हजर राहतात. त्यामुळं या विभागाकडं तक्रारी वाढल्या आहेत. शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी देखील अनेक छापे विभागानं टाकले आहेत, असं पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी सांगितलं.

तक्रारदारांनी संपर्क साधावा : लाच घेणं का कायद्यानं गुन्हा आहे. कायदेशीर कामासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. कोणी कामासाठी पैसे मागत असल्यास तक्रारदारांनी 1064 संपर्क करण्याचं अवाहन नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलं आहे. यावेळी तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. भाजपानं टूर अँड ट्रॅव्हल्स असं नविन खातं उघडलं असावं, राज ठाकरेंचा अमित शाह यांना टोला
  2. केंद्रात जाण्यावरुन फडणवीसांनी घेतली पत्रकारांचीच फिरकी, म्हणाले अद्याप मोदींकडून बोलावणं नाही
  3. नितीश कुमारांच्या वक्तव्यावर ठाकरे गप्प का, मंत्री उदय सामंत यांचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.