ETV Bharat / state

Abdul Sattar : कृषी महोत्सवासाठी कृषिमंत्र्यांचे टार्गेट; नाशिकच्या कृषी अधिकाऱ्यांना तिकीटविक्रीचे काम - कृषी महोत्सवासाठी कृषिमंत्र्यांचे टार्गेट

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात होणाऱ्या कृषी महोत्सवासाठी ( Abdul Sattar has Become a Topic of Discussion ) नाशिकच्या कृषी अधिकाऱ्यांना तिकीटविक्रीचे टार्गेट दिल्याने ( Target Ticket Sales For Agricultural Festival )अब्दुल सत्तारांचा हा उपक्रम मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. सिल्लोडमध्ये होणाऱ्या कृषिमहोत्सवासाठी असणाऱ्या कार्यक्रम पत्रिकेवर शेतकरी हिताऐवजी कलाकारांच्या कार्यक्रमाचा भडिमार अधिक ( Agricultural Festival Held in Sillod ) करण्यात आला आहे.

Nashik Agricultural Officers Target Ticket Sales For Agricultural Festival
कृषी महोत्सवासाठी कृषिमंत्र्यांचे टार्गेट; नाशिकच्या कृषी अधिकाऱ्यांना तिकीटविक्रीचे काम
author img

By

Published : Dec 27, 2022, 8:59 PM IST

नाशिक : महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar has Become a Topic of Discussion ) यांच्या मतदारसंघात 1 जानेवारी ते 10 जानेवारी असा दहा दिवसांच्या कृषी, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले ( Target Ticket Sales For Agricultural Festival ) आहे. मात्र, या कार्यक्रम पत्रिकेवर शेतकरी हिताऐवजी ( Nashik For Agricultural Festival ) कलाकारांच्या कार्यक्रमाचा भडिमार अधिक असून, यातून त्यांचे अर्थपूर्ण हित साधण्यात आले ( Agricultural Festival Held in Sillod ) आहे. याबाबत नाशिक विभागातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना 25 हजारांपासून ते 5 हजारापर्यंतचे प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड आणि सिल्व्हर असे पास विक्रीचे तोंडी आदेश देण्यात असल्याची चर्चा असून, याबाबत एका कृषी अधिकाऱ्यांने नाव न सांगण्याच्या अटीवरून सांगितले आहे.

अब्दुल सत्तारांच्या कृषी महोत्सवाला अनेक कलाकारांना निमंत्रण : काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आयोजित कृषी प्रदर्शन महोत्सवानिमित्त कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे नाशिकला आले होते. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मतदारसंघात सिल्लोड येथे कृषी महोत्सव करणार असल्याचे म्हटले होते. याच अनुषंगाने आता सिल्लोड येथे 1 जानेवारी ते 10 जानेवारी या दहा दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला रंगतदार बनवण्यासाठी अनेक कलाकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमाचा आर्थिक भार उचलण्यासाठी नाशिक कृषी विभागाला तिकीट विक्रीचे टार्गेट देण्यात आले आहे.

चर्चा केली तर उचलबांगडी नाशिक कृषी सहसंचालक कार्यालयांंतर्गत नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव असे जिल्हे येतात. यामध्ये नाशिक, जळगाव आणि नंदुरबार हे जिल्हे कृषी क्षेत्रात आघाडीवर असल्याने, या ठिकाणी कीटकनाशक विक्रेते, खत विक्रेते, बियाणे विक्रेते यांची संख्या अधिक आहे. तसेच, संजिवके तयार करणाऱ्या कंपन्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे नाशिक विभागातील गुणवत्ता व नियंत्रण हा विभाग अधिक चर्चित असतो. तसेच, कृषी महोत्सवाला मदत करण्यासाठीसुद्धा पुढे सरसावला आहे. मात्र, जो अधिकारी याबाबत माध्यमांना माहिती देईल, त्याची लगेच उचलबांगडी होण्याची कार्यलयात चर्चा सुरू आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.