ETV Bharat / state

नाशिक बंदची अफवा पसरवणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल - नाशिक अफवा बातमी

जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामध्ये काही समाजकंटकांनी फेरफार करत, नाशिक शहर 22 मे ते 31 मेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवली. यामुळे नाशिकच्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तेव्हा मांढरे यांच्या आदेशावरून तलाठी आनंद मेश्राम यांनी सरकार वाडा पोलीस ठाण्यात अफवा पसरवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

nashik administration fir file against lockdown related rumour mongering on social media
नाशिक बंदची अफवा पसरवणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
author img

By

Published : May 22, 2020, 4:38 PM IST

नाशिक - शहर रेड झोनमध्ये असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, 22 मे ते 31 मेपर्यंत नाशिक शहर संपूर्णपणे बंद राहणार असल्याची अफवा पसरवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तलाठी आनंद मेश्राम यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक बंदची अफवा पसरवणाऱ्या अज्ञाताविरोधात सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
कोरोना पार्श्वभूमीवर शहरात चौथ्या टप्यातील लॉकडाऊन सुरू आहे. विनापरवागी ज्या आस्थापना सुरू झाल्या आहेत, त्या बंद राहणार आहेत. या शिवाय शहरात सार्वजनिक वाहतूक होणार नाही. यात शहरातील बस सेवा, रिक्षांना परवानगी नाही. हे आदेश 31 मेपर्यंत लागू असतील. अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा नियमित सुरू राहणार आहेत. तसेच यापूर्वीच्या आदेशानुसार वेळेचे बंधन कायम असल्याचे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आदेशात म्हटलं आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामध्ये काही समाजकंटकांनी फेरफार करत, नाशिक शहर 22 मे ते 31 मेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवली. यामुळे नाशिकच्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तेव्हा मांढरे यांच्या आदेशावरून तलाठी आनंद मेश्राम यांनी सरकार वाडा पोलीस ठाण्यात अफवा पसरवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - 'राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना अधिकचा पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी राज्यस्तरावरून सूचना देण्यात याव्यात'

हेही वाचा - नाशिकमध्ये दारूविक्रेत्यांचा ऑनलाइन विक्रीला विरोध.. मद्यपींमध्ये संभ्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.