नाशिक - दोन महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा तपास करण्यात नांदगाव पोलिसांना यश आले आहे. रविवारी चोरीला गेलेला मुद्देमाल गढरीया कुटुंबाला स्वाधीन करण्यात आला आहे. आज लक्ष्मीपूजनादिवशीच त्या माउलीला तिचे सौभाग्याचे लेणं परत मिळाल्याने तिचा आंनद गगनात मावत नव्हता. नांदगाव येथील हनुमान नगर भागात राहणाऱ्या विजय पुंजु गढरीया यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती.
हेही वाचा - सांगली पोलीस दलात स्मार्ट मोबाईल ट्रॅफिक कार दाखल
नांदगाव शहरातील हनुमाननगर येथील विजय पुंजू गढरी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली होती. घरातून रोख 7 हजार पाचशे रुपयांसह सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 48 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास यंत्रणा कामाला लावली होती. त्यास रविवारी यश आले असून चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल परत मिळविण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. रविवारी दिवाळीच्या दिवशी गढरी कुटुंबाला संपुर्ण मुद्देमाल पंचासमक्ष परत करण्यात आला.
सर्वात महत्वाचे म्हणजे आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच सौभाग्याचं लेण म्हणजे मंगळसुत्र परत मिळाल्याने गढरी कुटुंबाचा आंनद गगनात मावत नव्हता. तर चोरी झालेला संपूर्ण मुद्देमाल परत मिळाल्याचे समाधान पोलिसांना वाटत होते. यापुढे नागरिकांनी बाहेर जातांना सावधनात बाळगण्याचे आव्हान केले.
दरम्यान, नांदगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी व सहायक पोलीस निरीक्षक बजरंग चौघुले यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार कारवाई करत तपास केला होता. त्यामुळे चोर आणि मुद्देमाल दोन्हीही मिळून आला तसेच संपूर्ण मुद्देमाल तक्रारदाराला परत दिल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. नागरिकांनी देखील सावधनाता बाळगण्याचे आव्हान पोलिसांनी यावेळी केले.
हेही वाचा - ११ हजार रुपये किलोची मिठाई खरेदीसाठी ठाण्यात झुंबड