मालेगाव : कर्नाटक येथील हिजाब प्रकरणानंतर ( Karnataka Hijab Controversy ) देशभर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या 'हिजाब गर्ल' मुस्कान खानने ( Hijab Girl Muskan Khan ) एकटीने हिजाब समर्थनार्थ लढा दिला. याच्या सन्मानार्थ मालेगाव येथील उर्दू हाऊसला मुस्कान खान असे नामकरण करण्याची घोषणा ( Malegaon Urdu House Named Muskan Khan ) महापौर ताहेरा शेख ( Mayor Tahera Sheikh ) यांनी केली आहे. लवकरच विशेष महासभेत तसा ठराव करुन शासनाकडे मंजुरीला पाठवण्यात येईल, असेही शेख यांनी सांगितले.
तिने हिम्मत दाखवली
कर्नाटक येथे एका महाविद्यालयात हिजाब घालुन येण्यासाठी परवानगी नाकारण्यात आल्यानंतर देशभरात याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. हे प्रकरण जरी न्यायप्रविष्ट असले तरी याला आता राजकीय वळण लागले आहे. यात हिजाब समर्थनार्थ येथील मुस्कान खान ही मुलगी एकटी लढली. 100 जणांच्या जमावाला तिने एकटीने प्रत्युत्तर देत हिम्मत दाखवली. याची दखल मालेगावच्या महापौर ताहेरा शेख यांनी घेतली. येथील महापालिकेच्या उर्दू हाऊस अर्थात किताब घरला त्यांनी मुस्कान खान असे नामकरण करण्याची घोषणा केली आहे. आगामी विशेष महासभेत हा ठराव करून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवून रीतसर हे नाव देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जमियत उलमा तर्फेही सन्मान..
या दरम्यान देशभरात मुस्कान खान या विद्यार्थ्यांनीचे कौतुक होत आहे. जमियत उलमा हिंद या संस्थेने तर 5 लाख रुपये बक्षीस म्हणून तिला जाहीर करून रीतसर चेकच तिला देण्यात आला आहे. याच धर्तीवर मालेगाव महानगर पालिकेच्या महापौर ताहेरा शेख यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.