नाशिक - शिवसेना नेते खासदार संजय राऊत आजपासून चार दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौर्यावर येणार आहेत. या दौर्यात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जाऊन ते प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
हेही वाचा - कोरोनामुळे बालकामगारांचे प्रमाण वाढले, शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याची गरज
नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा ते आढावा घेणार आहेत. रविवारी नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत. अनेक महिन्यांनंतर संजय राऊत उत्तर महाराष्ट्र दौर्यावर येणार असल्याने या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे. या दौऱ्यात संजय राऊत उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत जिल्हा परिषद, महापालिका, तसेच इतर लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत.
मालेगाव, धुळे, नंदूरबार, जळगाव या जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर रविवारी ते नाशिकमध्ये शिवसेना कार्यालयात येऊन येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीसंदर्भात जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी बैठक घेणार असल्याची माहिती नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.
हेही वाचा - पहिलाच पावसामुळे रेल्वेची वाहतुक ठप्प; मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद