ETV Bharat / state

मतदारांनी मत देताना मुख्यमंत्र्यांप्रमाणे तत्वतः निकष लावावा - खासदार डॉ.अमोल कोल्हे

शेतकर्‍यांना कर्जमाफी देत असताना मुख्यमंत्र्यांनी तत्वतः निकष लावलेत. यामुळे मतदारांनी आता मते देत असताना तत्वतः निकष लावणे गरजेचे आहे, असा टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.

author img

By

Published : Oct 12, 2019, 1:38 PM IST

अमोल कोल्हे

नाशिक - शेतकर्‍यांना कर्जमाफी देत असताना मुख्यमंत्र्यांनी तत्वतः निकष लावलेत. यामुळे मतदारांनी आता मते देत असताना तत्वतः निकष लावणे गरजेचे आहे, असा टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. बागलाण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचारार्थ नामपूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

हेही वाचा - सरकारची मस्ती मतदानातून उतरवा - खासदार डॉ. अमोल कोल्हे

कोल्हे म्हणाले, "महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी पाच वर्षात एखादा उद्योग उभा करून पाच हजार युवकांनाही नोकरी मिळवून दिली नाही. उद्योजकांना कर्जमाफी दिली, मात्र शेतकर्‍यांना कर्जमाफी देत असताना तत्वतः निकष लावले. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी जनतेच्या भावना दुखवल्या आहेत. मतदारांनी आता मत देतानाही तत्वतः निकष लावणे गरजेचे आहे" कुस्ती करायला पहिलवान राहिले नाहीत, या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना 'जर पहिलवान राहिले नाहीत तर पंतप्रधान, गृहमंत्री, भाजप अध्यक्ष हे महाराष्ट्रात आखाडा लढवायला येत आहेत की, कांदे खायला', अशी खिल्ली देखील डॉ. कोल्हे यांनी आपल्या भाषणादरम्यान उडवली.

Intro:नाशिक/सटाणा
जयवंत खैरनार
शेतकर्‍यांना कर्जमापी देत असतांना मुख्यमंत्र्यांनी तत्वतः निकष लावलेत. यामुळे मतदारांनी आता मते देत असतांना तत्वतः निकष लावणे गरजेचे असे मत खा.डॉ. अमोल कोल्हे यांनी बागलाण तालुक्यातील नामपूर येथील प्रचार सभेत व्यक्त केले.Body:महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी पाच वर्षात एखादा उद्योग आणून पाच हजार युवकांना तरी नोकरी मिळवून दिली काय? असा सवाल उपस्थित करीत उद्योजकांना कर्जमापी दिली मात्र शेतकर्‍यांना कर्जमापी देत असतांना तत्वतः निकष लावलेत. यामुळे शेतकरी, व कष्टकरी जनतेच्या भावना दुखविल्या आहेत. असे कोल्हे यावेळी पुढे म्हणाले.Conclusion:मुख्यमंत्री म्हणतात मैदानात कुस्ती करायला पहिलवान राहिले नाहीत, मग पंतप्रधान, गृहमंत्री, भाजपा अध्यक्ष हे महाराष्ट्रात आखाडा करण्यासाठी येत आहेत की, कांदे खाण्यासाठी येत आहेत अशी खिल्ली देखील डॉ. कोल्हे यांनी आपल्या भाषणात उडविली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.