नाशिक : प्रत्येकाने इतिहासातून नेहमी प्रेरणा घेतली (Amol Kolhe on Shivputra Sambhaji play) पाहिजे. जाज्वल्य इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवा. मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून रोजच्या राजकारणात छत्रपतींना आणू नका, प्रतिक्रियेपेक्षा कृती महत्त्वाची असल्याने इतिहासाचा अभिमान वाटेल, असे कार्य प्रत्येकाने करायला हवे, असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या आयोजन (Shivputra Sambhaji play in Nashik) नाशिकमध्ये 21 ते 26 जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे. त्यांनी या महानाट्याच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr Amol Kolhe) यांनी नाशिकमध्ये भेट दिली होती.
शिवभक्तीविषयी शंका नाही : मी कधीही कोणाच्या शिवभक्तीविषयी शंका घेत नाही. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या प्रत्येकाचे कार्य माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मी प्रतिक्रिया देण्यापेक्षा कृतीला जास्त महत्त्व देतो. त्यामुळे एकमेकांच्या वादात छत्रपतींचे कार्य झाकोळण्यापेक्षा त्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे जास्त महत्त्वाचे आहे, असेही डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe in Press Conference Nashik) म्हणाले. छत्रपती संभाजी महाराजांनी ( Chhatrapati Sambhaji Maharaj) स्वराज्याचा ध्यास घेतला होता. त्यांचे कार्यकर्तृत्व प्रचंड मोठे होते. म्हणूनच त्यांना दिलेली स्वराज्य रक्षक ही बिरुदावली जास्त व्यापक आहे. असे त्यांनी नाशिकमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले (Amol Kolhe on Shivputra Sambhaji play) आहे. रोजच्या राजकारणात महापुरुषांना आणू नये, असे आवाहन डॉ. कोल्हे त्यांनी केले.
'शिवपुत्र संभाजी' महानाट्य : नाशिकमध्ये 21 ते 26 जानेवारी या कालावधीत सायंकाळी 6 वाजता तपोवन, पंचवटी येथील मोदी मैदानात शिवपुत्र संभाजी महानाट्य सादर होणार आहे. 18 एकर परिसरात तीन मजली सेट उभारण्यात येणार असून घोडे ताफा आणि सुमारे 200 कलाकारांच्या संचासह हे महानाट्य सादर होणार आहे. तसेच या ठिकाणी शिवसृष्टी साकारण्यात येणार असून मैदानी खेळ, गडकिल्ल्यांची माहिती, शस्र यांची माहिती या ठिकाणी असेल असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले (Shivputra Sambhaji play in Press Conference Nashik) आहे. नाशिकमध्ये शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या आयोजन केले गेले (Amol Kolhe in Press Conference Nashik) आहे. राजकारण्यांनी महागाई, बेरोजगारी या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे, असे त्यांनी परिषदेत म्हटले (Press Conference Nashik) आहे.