ETV Bharat / state

खासदार भारती पवारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, नाशिकसाठी वेगळ्या पॅकेजची मागणी

निसर्ग चक्रीवादळाचा येवला तालुक्याला जोरदार फटका बसला आहे. येवला तालुक्यातील अंदरसूल येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी दिंडोरी मतदारसंघातील खासदार भारती पवार यांनी केली.

nashik
नुकसानग्रस्त भागाची खासदार भारती पवार यांच्याकडून पाहणी
author img

By

Published : Jun 6, 2020, 8:46 PM IST

नाशिक - निसर्ग चक्रीवादळाचा येवला तालुक्याला जोरदार फटका बसला आहे. येवला तालुक्यातील अंदरसूल येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी दिंडोरी मतदारसंघातील खासदार भारती पवार यांनी केली. या वादळात पोल्ट्री फॉर्मचे मोठे नुकसान झाले आहे.

अंदरसुल गावातील गजानन देशमुख यांच्या पोल्ट्री फार्म हा निसर्ग वादळात पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता, तर त्यात अनेक कोंबड्या या मृत्युमुखी पडल्या होत्या. याठिकाणी खासदार भारती पवार यांनी पाहणी केली असता सर्व नुकसानीचा पूर्णपणे आढावा घेतला. तसेच परिसरातील कांदा चाळीचे झालेले नुकसान, घरांची झालेली पडझड याठिकाणीही पाहणी करून त्यांनी आढावा घेतला. येवला तालुक्यात तसेच नाशिक जिल्ह्यात निसर्ग वादळ आणि पावसाने झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई शासनाकडून दिली जाईल, असे भारती पवार यांनी सांगितले. खासदार भारती पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी एक वेगळे पॅकेज नाशिक जिल्ह्याकरिता द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारुळे, तलाठी कमलेश पाटील उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.