ETV Bharat / state

Nashik Murder : त्र्यंबकेश्वरमध्ये कात्री भोसकून जावयाने केली सासूची हत्या, 'हे' आहे कारण

नवरा विनाकारण मारहाण करतो म्हणून सासरी न जाणाऱ्या पत्नीला पतीने बेदम मारहाण केली. पती आणि पत्नीचे भांडण सोडवण्यास गेलेल्या सासूवरही जावयाने हल्ला चढवत त्यांच्या पोटात कात्री भोसल्यांनं सासूचा जागीच मृत्यू झाला.

Nashik Murder News
Nashik Murder News
author img

By

Published : May 23, 2022, 5:32 PM IST

नाशिक - नवरा विनाकारण मारहाण करतो म्हणून सासरी न जाणाऱ्या पत्नीला पतीने बेदम मारहाण केली. पती आणि पत्नीचे भांडण सोडवण्यास गेलेल्या सासूवरही जावयाने हल्ला चढवत त्यांच्या पोटात कात्री भोसल्यांनं सासूचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी आणि अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड येथे घडली. ग्रामस्थांनी आरोपी पतीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड येथे इंदुबाई किसन पारधी ही विवाहित महिला आपली 12 वर्षाची मुलगी माधुरी हीला सोबत घेऊन काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती. पतीला दारूचे व्यसन असल्याने ती सासरी जाण्यास टाळाटाळ करत होती. रविवारी सासरी आलेल्या जावयाने दुपारच्या सुमारास पत्नीला घरी येण्याबाबत आग्रह केला. या दरम्यान पती आणि पत्नीमध्ये भांडण झाले. यावेळी पती किसन पारधी त्याचा राग अनावर झाला. त्याने पत्नी इंदुबाई हिला मारण्यास सुरुवात केली. या दरम्यान सासू कमळाबाई व मुलगी माधुरी पारधी हे भांडण सोडवण्यास गेले असता, किसान पारधी यांनी कमळाबाई यांच्या पोटात व पाठीवर कात्रीने वार केले. या घटनेत कमळाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी किसन यास पकडून झाडाला बांधून ठेवत पोलिसांना याबाबत माहिती दिली. जखमी पत्नी इंदूबाई आणि मुलगी माधुरी यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत पोलिसांनी आरोपी किसन पारधी यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वा - राजेश टोपे ऑन कोरोना चौथी लहर : आरोग्याचे... कोरोनाच्या लाटेबद्दल चौथ्या चाचण्या, म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.