नाशिक - नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर नाका येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खड्ड्यांभोवती पणत्या लावून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले आहे. महापालिका प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी उपनगर नाका येथे 'शेवटचा दिवा दिवाळीचा' खड्यांना समर्पित करून आंदोलन करण्यात आले.
या महामार्गावर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात, निवेदने दिली जातात. मात्र, ठोस काम न करता खड्डे बुजविण्याचे नाटक केले जाते. पण खड्डे हे नियमाप्रमाणे बुजवले जात नाही. त्यामुळे काही दिवसांतच रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडतात. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना वाहन चालवण्यास अडथळा येत असल्याने येथे अपघात होत असतात. महापालिका प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी उपनगर नाका येथे 'शेवटचा दिवा दिवाळीचा' खड्यांना समर्पित करून आंदोलन करण्यात आले. मनसेचे शहराध्यक्ष अंकुश पवार, शहर उपाध्यक्ष विक्रम कदम, किशोर जाचक, प्रकाश कोरडे, नितीन साळवे, संतोष सहाणे, नीलेश सहाणे, श्याम गोहाड, सोनू चव्हाण, बाजीराव मते, स्वप्निल कराड, सूरज नलावडे आदी उपस्थित होते.